मावळ लोकसभा निवडणूक निकाल रात्री उशिरापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 02:26 PM2019-05-22T14:26:09+5:302019-05-22T14:29:49+5:30

युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार अशी दुरंगी लढत आहे.

Maval Lok Sabha election results till late night | मावळ लोकसभा निवडणूक निकाल रात्री उशिरापर्यंत

मावळ लोकसभा निवडणूक निकाल रात्री उशिरापर्यंत

googlenewsNext
ठळक मुद्देमावळ मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणारएकाच वेळी मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार मतमोजणीवेळी अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेशमावळ लोकसभा निवडणूक मतदानाची सर्व तयारी पूर्ण

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रथमच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल येण्यासाठी सुमारे १५ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचा अंतिम निकाल मिळण्यास रात्र उजाडणार आहे. 
मावळ मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन केले आहे. या ठिकाणी विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. एकाच वेळी मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मतमोजणीवेळी अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.

निकालापूर्वीच चर्चा रंगल्या
मावळ लोकसभा मतदारसंघात रिंगणात एकूण २१ उमेदवार होते. युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार अशी दुरंगी लढत आहे. लोकसभा मतदारसंघात यंदा ५९.४९ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात मावळची जागा काही ठिकाणी युतीला आणि आघाडीलाही जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या समर्थकांमध्ये चुरशीची लढत आहे. 

अशी होणार मतमोजणी...
गुरुवारी सकाळी आठला इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. पोस्टल मतांची गणना होईल. त्यानंतर एका फेरीस ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. ईव्हीएमची मते मोजण्यास अधिक कालावधी लागला, तरी काही वेळाने ३५ मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण होईल. एका विधानसभा मतदारसंघाकरिता किमान १४ टेबल लावले आहेत. २९ फेºयांपर्यंत मोजणी होणार असल्याने निकाल येण्यासाठी १४ ते १५ तास लागणार आहेत. २५०४ ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी किमान दहा तास व त्यानंतर व्हीव्हीपॅटसाठी चार तास लागतील, असा अंदाज आहे. मतमोजणीचा अंतिम निकाल देण्यास रात्रीचे दहा ते अकरा वाजण्याची शक्यता आहे. 

* तीन निरीक्षकांची नेमणूक
निवडणूक आयोगाने या वेळी तीन निवडणूक निरीक्षक नेमले आहेत. २ विधानसभा मतदारसंघांमागे एक असे सहा मतदारसंघासाठी तीन निरीक्षक आहेत. तीनही निरीक्षक सोमवारी सायंकाळी शहरात आले असून, त्यांनी स्ट्राँग रूमसह मतदान मोजणी केंद्राचा आढावा घेतला आहे. 
....
* मावळ लोकसभा निवडणूक मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बालेवाडी येथे मतमोजणीची रंगीत तालीम बुधवारी (दि. २२) घेण्यात येणार आहे. प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. कामांचे वाटप केल्यानुसार आढावा घेण्यात येत आहे.
- कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकार
...............

विधानसभा    मतदान केंद्र संख्या     झालेले मतदान     फेºया
    चिंचवड     ४७०     २,८३,००४     २४
    पिंपरी     ३९९    १,८९,४०४     २९
    मावळ     ३६९     २,११,३८३     २७
    पनवेल     ५८४     २,९८,३४९     २५
    कर्जत     ३४३     १,८९,५७७     २५
    उरण     ३३९      १,९५,१०१     २५
 

Web Title: Maval Lok Sabha election results till late night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.