एनएसजी कमोंडोजकडून सिंबायोसिस इन्स्टिट्यूटमध्ये मॉकड्रील, नारगिकांत घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 12:02 AM2017-09-13T00:02:57+5:302017-09-13T00:02:57+5:30
नॅशनल सिक्युरीट गार्ड (एनएसजी) कमांडोच्या दिल्ली येथून आलेल्या दोन पथकांनी पुण्यामध्ये मॉकड्रील केले. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस इंस्टिट्यूटमध्ये अचानक दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती.
पुणे, दि. 12 - नॅशनल सिक्युरीट गार्ड (एनएसजी) कमांडोच्या दिल्ली येथून आलेल्या दोन पथकांनी पुण्यामध्ये मॉकड्रील केले. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस इंस्टिट्यूटमध्ये अचानक दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. हे मॉकड्रिल रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
एनएसजीची दोन पथके विमानाने पुण्यात दाखल झाली होती. ही पथके अवघ्या काही मिनिटातच विमानातळावरून सिमबायोसिस महाविद्यालयात दाखल झाली. त्यानंतर तातडीने सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. रस्ता बंद करण्यात आल्याने तसेच त्यामागील कारण स्पष्ट होत नसल्याने अफवांना ऊत आला होता. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आली होती. डेक्कन परिसरातील सर्वच रस्ते जाम झाले होते.
पुण्यातील अनेक ठिकाणे अती संवेदनशिल आहेत. त्यामुळे दरवर्षी एनएसजी पथकाकडून मॉकड्रील घेतले जाते. त्यामध्ये स्थानिक पोलिसांना सहभागी करून घेतले जात नाही.