अडीचशे जणांवर पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:29 AM2017-08-05T03:29:54+5:302017-08-05T03:29:54+5:30
महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत शेल्टर असोसिएट्स व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय आरोग्य विभागामार्फत संयुक्तरीत्या गुरुवारी बालाजीनगर येथे विशेष मोहीम राबविण्यात आली.
पिंपरी : महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत शेल्टर असोसिएट्स व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय आरोग्य विभागामार्फत संयुक्तरीत्या गुरुवारी बालाजीनगर येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. अस्वच्छता करणाºया २७० जणांवर कारवाई करण्यात आली असून, सुमारे ५६ हजारांचा दंड वसूल केला आहे.
महापालिका परिसरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शेल्टर असोसिएट्स व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय आरोग्य विभागामार्फत संयुक्तरित्या गुरुवारी बालाजीनगर येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. स्थानिक मुलांचा, महिलांचा या कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय सहभाग होता. आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून महानगरपालिकेच्या वाहनामध्ये देणे व घराच्या आजूबाजूला उघड्यावर, उघड्या गटर अथवा नाल्यात रस्त्याच्या बाजूला कचरा टाकून शहर परिसर अस्वच्छ करू नये. आपले घर परिसर स्वच्छ ठेवल्यास आपले आरोग्य चांगले राहील, याबाबत मार्गदर्शन व फेरी काढण्यात आली.