निगडीत चोरटे जेरबंद ,घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना निगडी पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:02 AM2017-09-08T02:02:52+5:302017-09-08T02:02:54+5:30

शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना निगडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या १२ गुन्ह्यांची कबुली दिली.

 Nigadi seized, robbing and robbing snatchers, trapped by police | निगडीत चोरटे जेरबंद ,घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना निगडी पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद

निगडीत चोरटे जेरबंद ,घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना निगडी पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद

Next

पिंपरी : शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना निगडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या १२ गुन्ह्यांची कबुली दिली. हर्षद गुलाब पवार, विकास सुनील घोडके आणि अयाझ अस्लम शेख (रा. लिंकरोड भटनगर पत्राशेड, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत कॉर्नर, अप्पूघरकडे जाणाºया रस्त्यावर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती खबºयामार्फत त्यांना मिळाली. त्यामुळे निगडी पोलीस पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. त्यांच्या मोटारीची झडती घेतली असता, एक लोखंडी कटावणी, वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्यांचा जुडगा, स्क्रू ड्रायव्हर, हेक्सॉ ब्लेड असे चोरीसाठी वापरात येणारे साहित्य आढळून आले.
आरोपींकडून निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ११, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीसाठी वापरात येणारी मोटार, दोन दुचाकी, तसेच चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले, पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title:  Nigadi seized, robbing and robbing snatchers, trapped by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.