नितीन गडकरी आज उद्योगनगरीत, नदी सुधार प्रकल्पाला गती मिळण्याची शहरवासीयांमध्ये आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:13 AM2017-09-08T02:13:32+5:302017-09-08T02:13:42+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
पिंपरी : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सीआयआरटीतर्फे नाशिक फाटा येथील कार्यालयात सुरक्षित व शाश्वत सार्वजनिक वाहतूक या विषयांवर राष्ट्रीय परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमालाही नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नवीन विस्तारात गडकरी यांच्याकडे नदी सुधार खात्याचा पदभार देण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवड
शहरातील नदी सुधार प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. ‘सीआयआरटी’च्या कार्यक्रमानिमित्ताने गडकरी शहरात येणार असल्याचे नदी सुधार प्रकल्पाला गती मिळण्याची आशा शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.