कोणाचा बापही मुंडे भगिनींना हरवू शकणार नाही, बीड -परळी त्यांचेचं :महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:13 PM2018-12-24T16:13:35+5:302018-12-24T16:16:41+5:30
महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे सलोख्याचे संबंध पुन्हा स्पष्ट झाले असून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात याची प्रचिती उपस्थितांना सोमवारी आली.
पुणे : महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे सलोख्याचे संबंध पुन्हा स्पष्ट झाले असून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात याची प्रचिती उपस्थितांना आली. बीड आणि परळी मुंडे भगिनींचेच असून कोणाचा बापही त्यांना तिथून हरवू शकणार नाही असे वक्तव्य पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर व्हॉट्स ऍपवर मीच निवडून येणार असे सांगणाऱ्यांना बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येतील असे आव्हानही देत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली.
भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'आठवणीतील मुंडे साहेब' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व भाजपचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात जानकर यांनी पुन्हा बारामतीतून निवडणूक लढवायची इच्छाही व्यक्त केली.ते म्हणाले की,माझा कोणताही स्वार्थ नसल्याने पंकजा यांना सोडण्याचे कारणच नाही. बारामतीतून निवडणूक हरलो तरी मी देशात हिरो ठरलो. त्यामुळे पंकजा ताई तुमचा आशीर्वाद असून द्या, पुन्हा कुस्ती खेळायची अशा शब्दात त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला.