पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:13 PM2018-01-23T18:13:59+5:302018-01-23T18:17:21+5:30

प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील ६० फुटी रस्ता परिसरातील ३० पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ३७ हजार १०० चौरस फूट अनधिकृत पत्राशडे भुईसपाट करण्यात आले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation takes action against 36 unauthorized shades in Pimple Gurav and Wakad | पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

Next
ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून कारवाई सुरू असल्याने नागरिक भयभीतअनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज

रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ड व क  क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील ६० फुटी रस्ता परिसरातील ३० पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ३७ हजार १०० चौरस फूट अनधिकृत पत्राशडे भुईसपाट करण्यात आले. तर वाकड येथील प्रभाग क्रमांक २५ येथील १६ पत्राशेड व प्लॅस्टिक शेडवर कारवाई करून सुमारे १० हजार ९५३ चौरस फूट पत्राशेड पाडण्यात आले. एकाच दिवशी वाकड व पिंपळे गुरव परिसरात ३६ पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ४८ हजार ५३ चौरस फूट अनधिकृत पत्राशेड जमिनोदोस्त केली.


मागील काही दिवसांपासून या भागात कारवाई सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. कारवाई  करत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पोलिसांबरोबरच सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 

Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation takes action against 36 unauthorized shades in Pimple Gurav and Wakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.