पीएमपी कर्मचा-यांना महिन्यात एकच रजा, गैरहजेरीचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:30 AM2018-02-08T01:30:35+5:302018-02-08T01:30:44+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) कर्मचा-यांच्या रजेबाबत कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. सर्वच कर्मचा-यांना महिन्यातून केवळ एकच रजा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे.
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) कर्मचा-यांच्या रजेबाबत कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. सर्वच कर्मचा-यांना महिन्यातून केवळ एकच रजा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे.
प्रशासनातर्फे काही दिवसांपासून गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जात आहे. गैरहजेरीचे प्रमाण अधिक असल्याने आता पीएमपीचे वाहक, चालक त्याचबरोबर प्रशासनात कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना महिन्यातून केवळ एकच रजा घेण्याची मुभा दिली जाणार आहे. सर्व आगारप्रमुख आणि मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पूर्वपरवानगीशिवाय कर्मचाºयाने रजा घेतल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही. गैरहजर राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
ज्या कर्मचाºयांनी या निर्णयाच्या अगोदर दोन रजा घेतल्या असतील, त्यांना सोयीनुसार एकच रजा घेता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय रजेसाठी ससून रुग्णालयाच्या अधिकाºयाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. यापूर्वी महापालिक रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात होते. खोटी प्रमाणपत्रे दिली जात असल्याच्या तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आला. कर्मचारी नसल्याने अनेक वेळा फेºया रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. ती आता होणार नसल्याचे सांगण्यात आले.