पुण्यात रेल्वे प्रवाशांची होतेय लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 01:39 AM2018-09-30T01:39:01+5:302018-09-30T01:39:04+5:30
पुणे-लोणावळा : पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण कमी
कामशेत : सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वे सेवा सध्या मोठ्या आणि भुरट्या चोऱ्यांचे ठिकाण झाले आहे. पुणे-लोणावळा लोकलमध्ये चोºयांचे प्रकार पूर्वी होत होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या चोºयांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवाशाचा मोबाइल, खरेदीच्या पिशव्या, पाकीट, पर्स आदी चोºया करणाºया अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. परंतु या प्रकाराबाबत पोलिसांकडे नागरिक तक्रार करीत नसल्याने या प्रकाराची अवस्था ना दाद, ना फिर्याद अशी झाली आहे.
कमी खर्चात शिवाय सुरक्षित प्रवास म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. इतर प्रवासी वाहने टाळून प्रवासी रेल्वेने प्रवास करणे उचित समजतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हाच रेल्वेचा प्रवास नागरिकांना विशेष करून महिलांना धोकादायक झाला आहे. पुणे ते लोणावळा लोकलने नोकरदार, व्यावसायिक, विक्रेते, विद्यार्थी, महिला आदी असे लाखोंच्या संख्येने दैनंदिन प्रवास करीत असतात. लोकल गाड्यांची संख्या व प्रवासी संख्या याचा ताळमेळ रेल्वे प्रशासनाला बसत नसल्याने एका गाडीत कोंबून कोंबून प्रवासी प्रवास करतात. याचाच फायदा भुरटे चोर घेतात़ मोबाइल, पाकीटमारी, सोन्याच्या चेन, हातातील घड्याळ व इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत असतात. प्रामुख्याने हे प्रकार गर्दीच्या स्टेशन भागात कायमच होत असतात. मात्र अलीकडेच काही चोरांच्या टोळ्या सक्रिय होऊन त्यांनी मावळातील शेवटच्या स्टेशन
भागात जाणाºयांना टार्गेट केले आहे. दोन ते चार जण बिनधास्त लोकलमध्ये शिरून जिवे मारण्याची धमकी देत प्रवाशांच्या जवळील ऐवज घेऊन लंपास करीत आहेत. हे प्रकार रात्री उशिराच्या लोकलमध्ये प्रामुख्याने होत आहेत. यात पुणे बाजूने निघालेल्या लोकलमध्ये पिंपरी-चिंचवड सोडले की
आकुर्डी, देहूरोड, भेगडेवाडी, घोरवाडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली भागांत या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.
दुर्लक्ष : तक्रार करूनही पोलिसांनी केली डोळेझाक
१एक आठवड्यापूर्वी कामशेत येथील स्थानिक तरुण याला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दापोडी रेल्वे स्टेशन येथे चार ते पाच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुटले. यात मोबाइल खिशातील २५०० रुपये व खरेदी केलेल्या सामानाची पिशवी आदींची चोरी झाली. विशेष म्हणजे या संबंधी स्टेशनच्या लोहमार्ग पोलिसांना सांगितले असता त्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यानंतर एक दिवसानंतर कामशेतमधील एका वृद्ध व्यापाºयांचा मोबाइल व जवळील पैसे देहूरोड रेल्वे स्टेशन भागात दोन अज्ञात चोरट्यांनी जिवे मारण्याची धमकी देत काढून घेतले.
२तळेगाव येथील एका दाम्पत्याचे दोन मोबाइल व खरेदी केलेल्या कपड्यांच्या पिशव्या देहूरोड ते भेगडेवाडी भागात पळवून नेल्या. तर मंगळवारी कान्हे फाटा येथे रात्री दहाच्या सुमारास लोणावळ्याकडे जाणारी लोकल आली असता दोन अज्ञात तरुण वातानुकूलित रेल्वे डब्यात शिरून कामशेतमधील एका महिलेचे दमबाजी करीत मोबाइल, पर्स व पिशवी घेऊन फरार झाले.
कामाचा ताण
चोरीच्या घटना सतत घडत असताना रेल्वेचे लोहमार्ग पोलीस कार्यतत्परता दाखवत नाहीत. तर मळवली, कामशेत, कान्हे, वडगाव, घोरवाडी, भेगडेवाडी भागांत लोहमार्ग पोलीस दिसतच नाही. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. स्थानिक पोलिसांना सांगितले तर तुम्ही लोहमार्ग पोलिसांकडे जा अशी उत्तरे मिळतात. रेल्वे रुळावर एखादा अपघात झाला की पंचनामा व त्यासंबंधी इतर कामासाठी रेल्वे पोलीस दिसतात.
गर्दुल्यांकडे दुर्लक्ष
लोणावळा ते पुणे अनेक रेल्वे प्रवासी संघटना फक्त नावापुरत्याच उरल्या आहेत. रेल्वे स्टेशन व रेल्वे रुळावर हुल्लडबाजी करणाºया तरुणांमुळे महिला, युवती व विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर मावळ भागातील अनेक रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्याचे अड्डे व अवैध धंदे सुरू आहेत.