स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:18 AM2017-08-28T01:18:22+5:302017-08-28T01:18:26+5:30

छतावरील पत्र्याला चिरा पडलेल्या... आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे.

Stadium godown; Chhatla Chiray, Asan system disaster | स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था

स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था

Next

पिंपरी : छतावरील पत्र्याला चिरा पडलेल्या... आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे. औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी. तसेच विविध खेळांमध्ये स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी याकरिता महापालिकेकडून प्रशस्त क्रींडागणे उभारण्यात आली. नेहरुनगर येथे याच धोरणाअंतर्गत अण्णासाहेब मगर स्टेडियम उभारणी करण्यात आली. या क्रीडांगणवर विविध खेळाडू सराव करुन अनेक जिल्हास्तरीय ते आतंरराष्ट्रीय, स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविले. मात्र, सध्या पालिक ा प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे स्टेडियम आहे की गोदाम असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

खेळाडूंसाठी ठरले वरदान
१९७५ रोजी कामगार कल्याण मंडळाच्या वतीने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने एकूण ५००० आसन क्षमता असलेले मगर स्टेडियम पाच एकर जागेत बांधण्यात आलेले आहे. विविध क्रीडा प्रकारांचा विचार करुन मैदान बांधले गेले. अनेक खेळाडूंसाठी हे मैदान वरदान ठरले आहे. आजतागायत विविध शालेय तसेच व्यावसायिक स्पर्धा या मैदानावर झाल्या आहेत. यातून कोट्यावधीचा निधी पालिकेस प्राप्त झाला. मात्र, या निधीतून स्टेडियमची वेळोवेळी देखभाल करण्याचा क्रीडा विभागास विसर पडलेला दिसून येतो.

३१ आॅगस्टपासून जिल्हास्तरीय स्पर्धा
याच मैदानावर ३१ आॅगस्ट पासून जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर दरम्यान या मैदानावर क्रिकेट, शुटिंगबॉल, व्हॉलीबॉल या सारख्या मैदानी खेळाचा समावेश आहे. या निमिताने अनेक खेळाडू, प्रेषक या ठिकाणी येणार आहेत. पण स्टेडियमची सध्याची अवस्था पाहता खेळाडू, प्रेक्षक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण होतो. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असणार ? हा सवाल उपस्थित होत आहे.
भंगाराचे गोदाम
स्टेडियमच्या प्रवेशाव्दारातून प्रवेश करताच समोर अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्याचे ढीग पहायला मिळतात. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने विविध कारवायांमध्ये जप्त केलेले साहित्य या मैदानात आणून टाकले आहे. त्यामुळे हे खेळाचे स्टेडियम आहे की भंगाराचे गोदाम असा खेळाडूंना प्रश्न पडतो.

लोखंडी कठडेही कमकुवत
स्टेडियमच्या बांधकामाची अवस्थादेखील भयावह झाली आहे. अनेक ठिकाणी भिंतीना चिरा पडलेल्या आढळून आल्या. भिंतीवरील प्लॅस्टर निघत आहे. त्यामुळे आतील लोंखडी गज स्पष्ट दिसून येतात. स्टेडियममधील आसनव्यवस्था अस्वच्छ झालेली दिसते. सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कठडेही कमकुवत झाले आहेत. या कठड्यांवर जोर देऊन उभा राहिल्यास तोल जाऊन दुर्घटना घडू शकते. छतावरील पत्रे अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत दिसून येतात. गेटच्या शटरचे लोखंडी पत्रे तुटलेल्या अवस्थतेत आहेत.

नोटिशीनंतरही नूतनीकरणाकडे दुर्लक्ष
याच स्टेडियम मध्ये क्रिडा ग्रंथालय, निवडणूक विभागाचे कार्यालय , मैदान बुकिंग कार्यालय असून या मोडकळीस आलेल्या स्टेडियममुळे तेथील कार्यालयांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत पालिका प्रशासनाला मागील वर्षी कळविले असून यासंदर्भात नोटीस आली असून अद्याप या स्टेडियमचे नूतनीकरण सुरू झालेले नाही.

मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वावर
मैदानावर अनेक भटक्या कुत्रांचा वावर सध्या वाढलेला आहे. मैदानावर सांयकाळी अनेक लहान मोठे खेळाडू सरावासाठी येत असतात. सरावाच़्या वेळी धावत असताना ही कुत्रे खेळाडूंच्या मागे धावतात, तर कधी अंगावर धावून येऊन भुंकू लागतात. परिणामी अनेक खेळाडंूनी धावणे बंद केलेले आहे. या संदर्भात तक्रार देऊनही या कुत्र्यांचा अद्याप बंदोबस्त करण्यात आला नाही आहे.

Web Title: Stadium godown; Chhatla Chiray, Asan system disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.