स्थायी समिती : पाच सदस्यांना मिळणार संधी, भाजपात इच्छुक नगरसेवकांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:28 AM2018-03-10T05:28:03+5:302018-03-10T05:28:03+5:30

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षांत अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहेत.

 Standing Committee: Opportunity to get five members, brother-in-law of corporates interested in BJP | स्थायी समिती : पाच सदस्यांना मिळणार संधी, भाजपात इच्छुक नगरसेवकांची भाऊगर्दी

स्थायी समिती : पाच सदस्यांना मिळणार संधी, भाजपात इच्छुक नगरसेवकांची भाऊगर्दी

Next

पिंपरी  - महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षांत अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे नवीन ५ सदस्यांची वर्णी स्थायी समितीवर लागणार आहे़ २० मार्चच्या सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. समितीत वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी पक्षात चुरस लागली आहे.
महापालिका स्थायी समितीत १६ सदस्य असून, त्यात भाजपाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एकाचा समावेश आहे. पहिल्या वर्षानंतर त्यातील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त होतात. यावर्षी सत्ताधाºयांनी स्थायी समितीवर अधिक सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी, म्हणून अकराही सदस्यांचे राजीनामे भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतले होते. व पाच वर्षांत ५५ सदस्यांना संधी देणार असे जाहीर केले होते. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे हे भाजपाचे सहा सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. त्यानंतर, या सदस्यांच्या जागेवर नव्याने नियुक्ती केली. लकी ड्रॉमध्ये भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच अपक्ष कैलास बारणे हे बचावले होते.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये यासाठी भाजपाने चिठ्ठीतून बचाविलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. निवडणूक प्रक्रिया निर्धोक पार पडल्यावर भाजपा नेतृत्वाने शुक्रवारी राजीनामे मंजूर करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार, महापौर नितीन काळजे यांनी राजीनामे मंजूर केल्याचे लेखी पत्र नगरसचिव विभागाला दिले.

...नेत्यांचे उंबरे झिजविताहेत
रिक्त झालेल्या पाच जागांवर संधी मिळावी, म्हणून भाजपाच्या नगरसेवकांनी नेत्यांकडे साकडे घातले आहे. याच समितीत संधी मिळावी, म्हणून नगरसेवक नेत्यांचे उंबरे झिजवित आहेत. या रिक्त जागांवर कोणाला संधी मिळणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. चुरस निर्माण झाली आहे.

Web Title:  Standing Committee: Opportunity to get five members, brother-in-law of corporates interested in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.