जलपर्णी काढण्यास सुरुवात, महापालिकेसह सरसावल्या सामाजिक संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:52 AM2018-03-17T00:52:12+5:302018-03-17T00:52:12+5:30
सांगवी, पिंपळे गुरव भागातील परिसराला लागून असलेल्या पवना नदीतील जलपर्णी वाढीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. डास व इतर किटकांमुुळे परिसरात आजार वाढत असल्याचे दिसून आले होते.
सांगवी : सांगवी, पिंपळे गुरव भागातील परिसराला लागून असलेल्या पवना नदीतील जलपर्णी वाढीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. डास व इतर किटकांमुुळे परिसरात आजार वाढत असल्याचे दिसून आले होते. त्या संदर्भात प्रभाग क्रमांक ३२ मधील माई ढोरे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे व शारदा सोनवणे या चारही नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. ‘लोकमत’ने याबाबत शुक्रवारी (दि. १६) सविस्तर वृत्त प्रसिद्ध
केले. त्याची दखल घेत पवना नदीपात्रातून येथे जलपर्णी काढण्यात येत आहे.
देहू येथील रानजाई प्रकल्प संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ मसुडगे, भाऊसाहेब विजन, राजू सावळे यांच्यासह सावरकर मित्र मंडळ, रोटरी क्लब, पोलीस मित्र संघटना आदी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांनी जलपर्णी काढण्यासाठी पुढाकार घेतला.
जलपर्णी काढून मोशी येथील कचरा डेपोत पाठवण्यासाठी महापालिकेच्या ‘ह’ प्रभागाचे
आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी जलपर्णी काढण्यासाठी पवना नदी घाटावर आले होते. अहिल्याबाई होळकर घाट व जुनी सांगवीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ साचलेली जलपर्णी काढण्यात आली.
सहायक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, वैद्यकीय अधिकारी राजेश भाट, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या सूचनेनुसार मुकादम अंकुश गवारे व कर्मचारांच्या मदतीने ही जलपर्णी काढण्यात आली. जलपर्णी काढण्याचे काम आणखी
काही दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासन या बाबतीत पूर्ण लक्ष देत आहे. लवकरच नदीपात्रातील जलपर्णी पूर्ण काढण्यात येईल.
- ज्ञानेश्वर सासवडकर, सहायक आरोग्य अधिकारी, ह प्रभाग
प्रभागाच्या चारही नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी आरोग्य अधिकाºयांना सूचना दिल्या होत्या. आरोग्य अधिकाºयांसह पाहणी करून कर्मच्याºयांना जलपर्णी काढण्याच्या सूचना दिल्या. जलपर्णी साठणार नाही यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जुनी सांगवीतील प्रियदर्शनीनगर जयराज रेसिडेन्सी व नवी सांगवी येथील साई सोसायटी आदी परिसरात औष्णिक धुरीकरण फवारणी करण्यात येत आहे.
- हर्षल ढोरे, नगरसेवक