दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या तिघांवर निगडीत धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:24 AM2018-02-10T11:24:36+5:302018-02-10T11:26:07+5:30

दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तिघांवर एका मोटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निगडीजवळ पुणे गेट हॉटेलसमोर हा प्रकार घडला.

stroke sharp-eared weapon in Nigadi, Pimpri Chinchwad | दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या तिघांवर निगडीत धारदार शस्त्राने वार

दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या तिघांवर निगडीत धारदार शस्त्राने वार

Next
ठळक मुद्देघटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार सुरूस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केले होते दोन पिस्तूल

देहूरोड : दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तिघांवर एका मोटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निगडीजवळ पुणे गेट हॉटेलसमोर हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी सुरूवातीला त्यांच्या दुचाकीला धडक मारून चिरडण्याचा प्रयत्न केला. घटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजकुमार कलिमूर्ती (४१), सतीशकुमार स्वामी कन्नु (३२) आणि अरविंद कुमार राजकुमार (१८ , सर्व रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत. 
पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सुरेश भिगानिया याच्याबरोबर जखमींचे पूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी त्याच्या घरावर दगडफेक करून मोठे नुकसान करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भिगानिया याच्याकडून दोन पिस्तूल जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर आजचा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास सुरु केला आहे.

Web Title: stroke sharp-eared weapon in Nigadi, Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.