ताडपत्री खरेदीत दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:21 AM2017-08-02T03:21:06+5:302017-08-02T03:21:06+5:30
महापालिकेकडून आषाढी वारीतील दिंडेकºयांना देण्यात येणाºया भेटवस्तूबाबत प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीचा एकपानी अहवाल सादर झाला आहे.
पिंपरी : महापालिकेकडून आषाढी वारीतील दिंडेकºयांना देण्यात येणाºया भेटवस्तूबाबत प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीचा एकपानी अहवाल सादर झाला आहे. त्यात निविदा प्रक्रिया वेळेवर, योग्य प्रकारे झाल्याचे नमूद केले आहे. तसेच दर्जाही उत्तम असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. खरेदी वेळेवर करण्यासाठी नियोजन करा या आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महापौर आणि आयुक्तांनी आदेश देऊनही वेळेवर खरेदी झाली नाही. प्रशासनाकडून दिरंगाई झाली, याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेकडून आषाढी वारीतील दिंडेकºयांना भेटवस्तू देण्यात येते. राष्टÑवादीच्या कालखंडात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदी गैरव्यवहार प्रकरण गाजल्यानंतर चौकशी समिती नेमली होती. त्यानुसार थेट पद्धतीने झालेल्या खरेदीला आक्षेप घेतला होता. समितीने काही शिफारशी केल्या होत्या.
भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर सभापती सीमा सावळे यांनी सण उत्सवाचे नियोजन करावे, वेळापत्रक करावे, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर १८ एप्रिलला झालेल्या बैठकीत भेटवस्तूबाबत किंवा वारकºयांना देण्यात येणाºया सुविधांबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशी सूचना महापौरांनी केली होती. त्याच दिवशी आयुक्तांना पालखी सोहळ्यासाठी भेटवस्तू सन्मानचिन्ह यांची मागणी भांडार विभागाकडे करावी, असा निर्णय झाला होता. मात्र, ताडपत्री खरेदीवेळी अनेक शिफारशी गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत.