चक्क शौचालय गेले चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:25 AM2018-05-09T03:25:33+5:302018-05-09T04:41:52+5:30

पूर्वी विहीर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा झाली होती. त्याच पद्धतीने ताथवडे येथील चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 The toilets went stolen, filed a complaint in the police | चक्क शौचालय गेले चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल

चक्क शौचालय गेले चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल

googlenewsNext

वाकड - पूर्वी विहीर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा झाली होती. त्याच पद्धतीने ताथवडे येथील चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक योगेश बबन फल्ले (वय ३३, रा. रामनगर, रहाटणी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, ‘स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत महापालिकेने मुंबई-बंगळूर महामार्गावर ताथवडे येथील चौकात सेवा रस्त्याच्या दुतर्फा ११ नोव्हेंबर २०१७ रोजी १५ लाख रुपये खर्चून लोखंडी ट्रॉलीत प्रत्येकी पाच फिरती शौचालये उभी केली होती. या शौचालयाचा वापर अनेक नागरिक करीत होते.
दरम्यान, ११ एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले असता ट्रॉलीसह शौचालय गायब असल्याचे समोर आले. याबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर शौचालयाचा शोध घेण्यात आला. मात्र, शोध लागत नसल्याने पोलिसांची मदत घेतली. मात्र, शौचालयाचा ठावठिकाणा मिळाला नाही. अखेर सोमवारी येथील शौचालय चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस दफ्तरी या ट्रॉलीसह शौचालयाची किंमत दीड लाख नोंदविली आहे.

ंसहा महिन्यांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत हे फिरते शौचालय ताथवडे येथे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात ते गायब असल्याचे कर्मचाºयांच्या लक्षात आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. प्रयत्न करूनही ते मिळून न आल्याने अखेर फिर्याद देण्यात आली.
- योगेश फल्ले, आरोग्य निरीक्षक

Web Title:  The toilets went stolen, filed a complaint in the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.