जुळ्या मुलींच्या जन्मदात्रीची झुंज; पाषाणहृदयी पित्याने फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:39 AM2018-02-13T03:39:16+5:302018-02-13T03:39:33+5:30

एकमेकांना जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका घेऊन प्रेमविवाह केला. जुळ्या मुलींना जन्म दिला म्हणून ‘‘तू आणि तुझ्या मुली, माझा यापुढे तुझ्याशी काही संबंध राहणार नाही,’’ असे सांगून विवाहाची वर्षपूर्ती होण्याआगोदरच पत्नीला एकाकी सोडून दिले आहे.

Twin girls' birth control; The stone-hearted father revolved around the text | जुळ्या मुलींच्या जन्मदात्रीची झुंज; पाषाणहृदयी पित्याने फिरवली पाठ

जुळ्या मुलींच्या जन्मदात्रीची झुंज; पाषाणहृदयी पित्याने फिरवली पाठ

Next

पिंपरी : एकमेकांना जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका घेऊन प्रेमविवाह केला. जुळ्या मुलींना जन्म दिला म्हणून ‘‘तू आणि तुझ्या मुली, माझा यापुढे तुझ्याशी काही संबंध राहणार नाही,’’ असे सांगून विवाहाची वर्षपूर्ती होण्याआगोदरच पत्नीला एकाकी सोडून दिले आहे. जन्मदात्या पित्याला मुली नकोशा झाल्या, मात्र जन्मदात्रीचा त्या मुलींचा जीव वाचविण्याची धडपड. त्या मातेने मुलींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, मृत्यूशी झुंज देत असलेले जुळ््यातील एक बाळ बाराव्या दिवशी सोमवारी सायंकाळी दगावले. मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली माता एक बाळ दगावल्याने आणखी विवंचनेत पडली आहे.
नऊ महिने पूर्ण होण्याआगोदरच प्रसूती झाल्याने जुळ्या मुलींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा जन्मदाता पिता पंजाबमध्ये, त्याला मुली नकोशा झालेल्या, परंतु जन्मदात्रीची मुलींना वाचविण्याची धडपड सुरू होती. तिने पैशांची जमवाजमव करून बाळांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली माता एक बाळ दगावल्याने आणखी विवंचनेत पडली आहे. पतीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. प्रसूतीला अवघे दहा दिवस झालेले, त्यात एक बाळ दगावले, निदान दुसरे बाळ तरी वाचविणे शक्य होईल, यासाठी तिची धडपड सुरू आहे.

आयुष्याची साथ देणाºयाने टाकले संकटात
पोलिसांकडे तक्रार तरी काय द्यायची. तक्रार द्यायला बाहेर पडता येत नाही. आर्थिक संकट आहेच, त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच विश्वासघात केला. आता मदत तरी कोणाकडे मागायची, अशी केविलवाणी अवस्था जुळ्या मुलींना जन्म देणाºया मातेची झाली आहे. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देणाºयाने संकटात एकटीला सोडले. त्या संकटाशी तिची एकाकी झुंज सुरू आहे. वयोवृद्ध माता, पिता मुलीवर ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी तिला साथ देत आहेत. घरात तिन्ही मुली, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची, वडील धार्मिक विधी व पूजापाठ करून मिळेल त्या पैशांवर चरितार्थ चालवितात. तर आई स्वयंपाकाचे काम करते. लग्न होऊन मुली बाहेर गेल्या, आता त्यांनाही कोणाचा आधार नाही, आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देत मुलीला सावरण्याची त्यांचीही केविलवाणी धडपड सुरू आहे.

Web Title: Twin girls' birth control; The stone-hearted father revolved around the text

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.