उमटले ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चे स्वर

By admin | Published: December 25, 2015 01:38 AM2015-12-25T01:38:24+5:302015-12-25T01:38:24+5:30

श्री दत्त जन्मोत्सव सोहळा शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. ठिकठिकाणच्या मंदिरात ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चे भक्तिमय स्वर उमटत

Vocal voice of Shripad Vallabh Digambara | उमटले ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चे स्वर

उमटले ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चे स्वर

Next

पिंपरी : श्री दत्त जन्मोत्सव सोहळा शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. ठिकठिकाणच्या मंदिरात ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चे भक्तिमय स्वर उमटत होते. दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रुपीनगरात दत्त याग तळवडे : रुपीनगर येथील श्री दत्तसेवा प्रतिष्ठान रुपी सहकारी गृहरचना संस्थेतर्फे श्री अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र पारायण, तसेच दत्तयाग यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शुक्रवारी सुरू झालेल्या हरिनाम सप्ताहात भाविकांसाठी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन व प्रवचनसेवा केली. दत्तजन्मनिमित्ताने सकाळपासून महापूजा, अभिषेक, होमहवन, तसेच दत्तयाग कार्यक्रम व दुपारी हभप बाबूरावमहाराज तांदळे यांचे दत्तजन्माचे कीर्तन झाले. कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. सप्ताहाची समाप्ती शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने होणार असून, ज्ञानेश्वरी, गाथा व गुरूचरित्र यांसारख्या ग्रंथांच्या दिंडीचे आयोजन केले आहे.
सहयोगनगर येथील गुरुदत्त हौ. सोसायटी येथेही सन १९८५पासून दर वर्षी अखंडितपणे श्री दत्तजन्मानिमित्त होमहवन, अभिषेक, सत्यनारायण महापूजा व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात असून, यामध्ये तीनशे ते चारशे भाविक उपस्थित राहत असतात. यासाठी सोसायटीतील सभासद स्वच्छेने मदत करत असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली.
वाल्हेकरवाडीत कीर्तन, संतवाणी
चिंचवड : वाल्हेकरवाडी, सायली कॉम्प्लेक्स येथे गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीने दत्तजयंती सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, संगीता भोंडवे, बाळासाहेब तरस, विष्णू नेवाळे, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, मंडळाचे अध्यक्ष चंद्रहास वाल्हेकर, प्रवीण वाल्हेकर, राजाराम वाल्हेकर आदी उपस्थित होते. हभप सुप्रिया साठे यांच्या दत्तजन्मावरील कीर्तनात भाविक तल्लीन झाले होते.
गायक पंडित संजय गरुड यांनी संतवाणी सादर केली. वारकरी, दत्तभक्त, महिला, आबालवृद्ध यांनी हरिपाठ, दिंडी सोहळा, कीर्तनसेवा यात सहभाग घेतला. कर्नाटक येथून आलेल्या भजनी मंडळींनी सादर केलेल्या भजनमालिकेने वातावरण भक्तिमय झाले होते.
चिंचवडमध्ये पालखी
चिंचवड : भजन, कीर्तन, पालखी सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांतून चिंचवडमध्ये श्री दत्त जन्मसोहळा आनंदात साजरा झाला. उद्योगनगरमधील श्री स्वामी समर्थ दत्त सेवा ट्रस्ट व पांढरकरनगरातील श्री दत्त सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उद्योगनगर येथील मंदिरात हभप करंबेळकर यांनी दत्तयाग व हभप गोरखमहाराज ढमाले यांचे कीर्तन झाले. सायंकाळी परिसरातून पालखी परिक्रमा काढण्यात आली. या वेळी परिसरातील नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. रस्त्यावर रांगोळी टाकण्यात आली होती. दिगंबरा, दिगंबरा असा जयघोष करीत अनेक भक्तगण या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. सायंकाळी सातला मंदिरात जन्मसोहळा संपन्न झाला. ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. अध्यक्ष सत्यनारायण ओझा, नगरसेवक सुजीत पाटील यांच्यासह श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने योगदान दिले.
सुभाष पांढरकरनगरातील श्री दत्त सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. दळवीनगर भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. सकाळी सहाला मूर्ती अभिषेक कार्यक्रम झाला. रामदासी गुरुजी यांच्या हस्ते दत्तयाग करण्यात आला. श्री हरी विठ्ठल भजनी मंडळाने हरिपाठ, काकडा व दिंडी भजन सादर केले. सायंकाळी सहाला दत्त जन्मसोहळा व प्रसादवाटप झाले. नगरसेवक नीलेश पांढरकर व जगदीश शेट्टी यांनी योगदान दिले. प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रकाश पांढरकर, गणेश गेळेकर, अंकुश साखरे, राजेंद्र लोखंडे, राजेंद्र लोखंडे, शंभू पांढरकर, लक्ष्मी शंकर शर्मा, दिनेश पांढरकर, रफिक खान, सतीश शिंदे, भाऊसाहेब उबाळे आदींंनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Vocal voice of Shripad Vallabh Digambara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.