"मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 06:13 AM2019-03-08T06:13:51+5:302019-03-08T06:14:12+5:30

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आलिंगन देणारे व हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयला पठाणकोट येथे चौकशीसाठी येण्याचे आमंत्रण धाडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत

"Modi is Pakistan's poster boy" | "मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय"

"मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय"

googlenewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आलिंगन देणारे व हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयला पठाणकोट येथे चौकशीसाठी येण्याचे आमंत्रण धाडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.
बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागणारे विरोधी पक्ष हे पाकिस्तानचे पोस्टर बॉइज असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यावर टोला हाणताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही नव्हे तर मोदीच पाकिस्तानचे पोस्टरबॉय आहेत. नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी मोदी यांनी त्यांना जाहीरपणे आलिंगन दिले होते. तसेच शरीफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कसलेली अधिकृत निमंत्रण मिळालेले नसतानाही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी पाकिस्तानात गेले होते. बालाकोटवर केलेल्या हल्ल्यामुळे नेमके काय साधले, असा सवाल पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी केला आहे, याची आठवणही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी करून दिली.
राफेल दस्तावेजांच्या झालेल्या चोरीबद्दल जर चौकशी करण्यात येते, तर विमाने खरेदीतील ३० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ््याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. ते म्हणाले की, राफेल व्यवहाराबाबत भारतीय शिष्टमंडळाकडून बोलणी सुरू असताना काही जणांकडून समांतर बोलणीही सुरू होती. या विमानांच्या खरेदीला पंतप्रधानांनी मुद्दामहून उशीर केला. कारण अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करून देण्याचा मोदींचा इरादा होता. न्याय सर्वांसाठी समान असावा. मात्र केंद्र सरकार मोदी यांना वाचवत आहे.
>राहुलना पाकचे प्रमाणपत्र हवे का?
राफेल विमाने व्यवहाराबाबत राहुल गांधी खोटेनाटे आरोप करीत आहेत. त्यांचा ना भारतीय हवाई दलावर विश्वास आहे ना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर. राफेल विमानांबाबत राहुल गांधी यांना पाकिस्तानकडून प्रमाणपत्र हवे आहे का, असा सवाल भाजपाने विचारला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, राफेल व्यवहारात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्टपणे म्हटलेले आहे. राहुल गांधी यांनी कॅगवरही अविश्वास दाखविला आहे.

Web Title: "Modi is Pakistan's poster boy"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.