पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी , मृतांचा आकडा २० वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:41 PM2018-09-22T16:41:58+5:302018-09-22T16:43:17+5:30

राज्यात पुण्यासह नाशिकमध्ये स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही अधिक आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे स्वाईन फ्लुची केंद्र बनली आहेत.

10 more people died due to swine flu and number of dead was 20 In Pune | पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी , मृतांचा आकडा २० वर 

पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी , मृतांचा आकडा २० वर 

Next
ठळक मुद्देसध्या विविध रुग्णालयांमध्ये १०९ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३७ जण व्हेंटिलेटरवर

पुणे : स्वाईन फ्लूने शहरात आणखी १० जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा २० वर पोहचला आहे. तर सध्या विविध रुग्णालयांमध्ये १०९ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. 
मागील दोन महिन्यांत शहरात स्वाईन फ्लुने कहर केला आहे. राज्यात पुण्यासह नाशिकमध्ये स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही अधिक आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे स्वाईन फ्लुची केंद्र बनली आहेत. शनिवारी पुण्यातील मृतांचा आकडा २० वर पोहचला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ आॅगस्टपासून आतापर्यंत १० जणांचा स्वाईन फ्लुने मृत्यू झाला झाला आहे. आॅगस्ट महिन्यात तीन महिलांना प्राण गमवावे लागले. त्यातील एक महिला उस्मानाबाद येथील तर दोन पुण्यातील होत्या. तर पालिकेच्या दि. १५ सप्टेंबर रोजीच्या अहवालामध्ये ७ जणांना मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. 
------------------------  
स्वाईन फ्लुची सद्यस्थिती   
दि. १ जानेवारीपासून -   
तपासणी - ६ लाख ५५ हजार ६३९ 
टॅमी फ्लु दिल्या - ८ हजार ४५२
नमुने तपासले - १२४१
स्वाईन फ्लु बाधित- २०२  
एकुण मृत्यू - २० 
सध्या रुग्णालयांत उपचार - १०९
व्हेंटिलेटरवरील रुग्ण - ३७

Web Title: 10 more people died due to swine flu and number of dead was 20 In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.