संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून मोकातील फरार आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 07:40 PM2017-11-17T19:40:44+5:302017-11-17T19:45:39+5:30

संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून मोकातील फरारी आरोपीस अटक करण्यात आले. त्याच्या ताब्यातून ३५ हजार ९०० रुपयांची शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

The absconding accused arrested by anti-crime squad | संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून मोकातील फरार आरोपी अटकेत

संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून मोकातील फरार आरोपी अटकेत

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मोका) फरारी आरोपीस अटक एक गावठी पिस्तूल, तीन जीवंत काडतूसे अशी ३५ हजार ९०० रुपयांची शस्त्रास्त्रे हस्तगत

पुणे : संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून (उत्तर विभाग) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मोका) फरारी आरोपीस अटक करण्यात आले. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, तीन जीवंत काडतूसे अशी ३५ हजार ९०० रुपयांची शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
राहुल चंद्रकांत पवार ( वय २४, रा. नसरापूर, ता. भोर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची भोर तालुक्यात गुन्हेगारी टोळी आहे. खंडणी विरोधी पथकाला मोकातील फरार आरोपी वडगाव बुद्रुक गावठाणात कॅनॉलजवळ येणार असल्याची, तसेच त्याच्याजवळ गावठी पिस्तूल असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांनी सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्या झडतीत एक गावठी पिस्तूल व तीन जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. त्याच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, पळवून नेणे, गंभीर जखमी करणे, जागेचा कब्जा घेणे व पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.  
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस कर्मचारी निलेश शिवतरे, भालचंद्र बोरकर, तानाजी गाडे, अतुल मेंगे, दत्ता फुलसुंदर, शितल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: The absconding accused arrested by anti-crime squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे