पडवी झाले १५ वर्षांनंतर जलमय, जलयुक्त शिवार ठरले वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:14 AM2017-10-22T02:14:06+5:302017-10-22T02:15:20+5:30
दौंड तालुक्यातील पडवी गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पाऊस पडूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्याने गावक-यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.
वरवंड: दौंड तालुक्यातील पडवी गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पाऊस पडूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्याने गावक-यांंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, ग्रामस्थांनी एकत्र येत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सर्व ओढ्यांचे आणि तलावांचे खोलीकर केले. जवळपास १५ वर्षानंतर यावर्षीच्या पावसात हे सर्व तलाव आणि आढे ओसंडून वाहू लागले आहे. जिरायती भागात ग्रामस्थांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
मनात ईच्छा असेल तर माणू काहीही करू शकतो ही म्हण पडवी ग्रामस्थांनी यथार्थ साध्य केली आहे. दुष्काळातून गावाला मुक्त करण्यातसाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले. गावातील सर्व ओढे तसेच नाल्यांचे खोलीकरण जलयुक्त शिवार या अभियानाअंगर्तत ग्रामस्थांनी केले. यंदा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पडवी येथील ओढे नाले पाण्याने भरून वाहत आहे. गायकवाड मळा येथील पाझर तलावात पावसामुळे साचलेल्या पाण्याचे पुजन सरपंच राजेंद्र शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र शितोळे,आबा गायकवाड, लहु गायकवाड, संदीप शितोळे, सुरेश गायकवाड, निलेश शितोळे, अतुल गायकवाड, सोमनाथ गायकवाड उपस्थित होते.
>पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील
गायकवाड मळयामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. जवळपास १० ते १५ वर्षांनी गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गावामध्ये एकूण २५ सिमेंट बंधारे व माती नाला ६९ बंधारे असून यासर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. गायकवाड मळ््यामध्ये जानाई शिरसाई माध्यमातून पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार गायकवाड मळ््यातील पाझर तलावामध्ये पाणी मिळण्यासाठी तालुक्याचे आमदार राहुल कुल राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून तो विषय मार्गी लावणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
- राजेंद्र शितोळे, सरपंच