तब्बल ७ वर्षांनंंतर शिक्षणसेवक म्हणून रुजू
By admin | Published: April 25, 2017 03:56 AM2017-04-25T03:56:26+5:302017-04-25T03:56:26+5:30
पुणे जिल्ह्यातील २६ डी. एड. विद्यार्थ्यांना प्रशासनाने तब्बल ७ वर्षांच्या संघर्षानंतर शिक्षणसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू केले.
केडगाव : पुणे जिल्ह्यातील २६ डी. एड. विद्यार्थ्यांना प्रशासनाने तब्बल ७ वर्षांच्या संघर्षानंतर शिक्षणसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू केले.
महाराष्ट्रात २०१० मध्ये सी. ई. टी. परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये अनेक यशस्वी विद्यार्थी शिक्षणसेवक म्हणून रुजू झाले. या सी. ई. टी. च्या लेखी परीक्षेमध्ये काही ५ लेखी प्रश्न चुकले होते. यामुळे थोडक्यात मेरिटमध्ये न बसणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी याविरोधात पेपर पुन्हा तपासावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रश्न चुकल्यामुळे या याचिकेचा निकाल २०१४ मध्ये विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला. याचा फायदा महाराष्ट्रातील तब्बल ३५०० विद्यार्थ्यांना झाला. त्यानंतर संबंधित विद्यार्थी आपापल्या जिल्ह्णात शिक्षणसेवक म्हणून रुजू झाले. परंतु पुणे जिल्ह्णातील ९० विद्यार्थ्यांना रोस्टरचे काम अपूर्ण दाखवून प्रशासनाने शिक्षणसेवक म्हणून रुजू करून घेतले नाही. याविरोधात संबंधित विद्यार्थ्यांनी आंदोलन, उपोषण व चर्चा आदी मार्ग अवलंबले.
२०१५ मध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ५ दिवसांचे उपोषण केले. अखेर पुणे येथील प्रशासनाला जाग आली. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये ९० पैकी २६ विद्यार्थी पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू झाले. याबाबत शिक्षणसेवक कलीम तांबोळी म्हणाले, की सुमारे ७ वर्षांच्या संघर्षांनंतर आम्हाला नोकरी मिळाली.