मांसाहार विक्रीच्या दुकानांमुळे विमान उड्डणामध्ये अडथळे
By admin | Published: May 6, 2015 06:30 AM2015-05-06T06:30:11+5:302015-05-06T06:30:11+5:30
लोहगाव विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे चिकन-मटणची दुकाने सुरूअसून, हे दुकानदार कचरा, मेलेल्या जनावरांचे अवशेष परिसरात टाकतात.
पुणे : लोहगाव विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे चिकन-मटणची दुकाने सुरूअसून, हे दुकानदार कचरा, मेलेल्या जनावरांचे अवशेष परिसरात टाकतात. यामुळे भटकी कुत्री, अन्य प्राणी व पक्षी येथे जमा होऊन विमान उड्डाणामध्ये अडथळा येत आहे. यामुळे विमान धावपट्टीवर उतरताना व हवेत उड्डाण करताना विमानाचे अपघात होण्याची शक्यता आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, या सर्व अनधिकृत दुकानांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
लोहगाव एअरफोर्स स्टेशनच्या अॅरोस्पेस सेफ्टी सेक्शनच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना लेखी पत्र दिले आहे. यामध्ये विमान अपघातास कारणीभूत असणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रामध्ये लोहगाव विमानतळाच्या परिसरात तब्बल ४० पेक्षा अधिक अनधिकृत चिकन-मटण यांची दुकाने आहेत. हे दुकानदार विमानतळाच्या आजूबाजूलाच दुकानातील कचरा टाकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात घारी, अन्य पक्षी, भटकी कुत्री येथे जमा होतात. अनेक वेळा भटकी कुत्री विमनतळाच्या धावपट्टीपर्यंत येतात. विमान उड्डाणाच्या व लँडिंग करताना घारी, पक्ष विमानच्या मध्ये येतात. यामुळे विमानाचा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विमानतळ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
४निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी सांगितले, की याबाबत पुणे महानगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रदूषण महामंडळ, ग्रामीण पोलीस अधीक्षक आदी सर्वांना लेखी आदेश देऊन या दुकानदारांवर व या कचऱ्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.