अंनिस व हिंदुत्ववादी संघटना आमनेसामने, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन : अंनिसचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:29 AM2017-08-21T04:29:06+5:302017-08-21T04:29:06+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसकडून रविवारी सकाळी मुसळधार पावसामध्ये महर्षी शिंदे पुल ते साने गुरूजी स्मारक असा निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याना कधी पकडणार, याची विचारणा करणाऱ्या घोषणा देत ‘जवाब दो’चा पुकार यावेळी करण्यात आला.

Anis and Hindu activist organizations, in the face of this, Dr. Narendra Dabholkar Memorial Day: Annis Prohibition Front | अंनिस व हिंदुत्ववादी संघटना आमनेसामने, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन : अंनिसचा निषेध मोर्चा

अंनिस व हिंदुत्ववादी संघटना आमनेसामने, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन : अंनिसचा निषेध मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसकडून रविवारी सकाळी मुसळधार पावसामध्ये महर्षी शिंदे पुल ते साने गुरूजी स्मारक असा निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याना कधी पकडणार, याची विचारणा करणाऱ्या घोषणा देत ‘जवाब दो’चा पुकार यावेळी करण्यात आला.
मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सकाळीही कायम होता. भर पावसामध्ये छत्र्या, रेनकोट घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्च्यासाठी आले होते. सकाळी साडेसात वाजता महर्षी शिंदे पुलावरून मोर्चाला सुरुवात झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावा, कॉ. मुक्ता मनोहर, अंनिसचे सरचिटणीस हमीद दाभोलकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रंगकर्मी अतुल पेठे, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
महर्षी शिंदे पूल, महापालिका, शनिवार वाडा, बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, टिळक चौक, नवी पेठ, दांडेकर पूल ते साने गुरूजी स्मारक असा मोर्चा काढण्यात आला. हू किल्ड दाभोलकर? जवाब दो, जवाब दो!, विवेकाचा आवाज बुलंद करू या, मुर्दाड शासनाचा तीव्र धिक्कार असो, लडेंगे जितेंगे, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
मोर्च्याच्या सुरुवातीला बोलताना
बाबा आढाव म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकर यांच्या मारेकºयांना पकडून देणाºयांसाठी जाहीर केलेल्या बक्षिसाचे आकडेसुद्धा फसवे आहेत. मुख्यमंत्री सतत फक्त आकड्यांचा आधार घेऊन बोलत असतात. पण हे आकडे कधीच खरे होत नाहीत. त्यांनी दिलेला ना कर्जमाफीचा आकडा खरा ठरला,
ना शेतकºयांच्या आत्महत्यांचा आकडा खरा ठरला.’’

सरकार पोसतेय दहशतवाद : बाबा आढाव
अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला वर्षामागून वर्षे उलटत आहेत. मात्र, सरकार त्यांचे मारेकरी पकडण्यात अपयशी ठरले आहे. सरकारला मारेकरी शोधायचे आहेत का, हाच प्रश्न पडतो आहे. एकीकडे गोरक्षकांनी चालवलेला हिंसाचार आणि दुसरीकडे दाभोलकर, पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्य करणाºयांचे खून हे चित्र पाहता सरकार दहशतवाद पोसत असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामााजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केली.

सोशल मीडियावरूनही मोहीम
अंनिसकडून रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये सोशल मीडियातून ‘जवाब दो’ हा हॅशटॅश वापरून दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या मारेकºयांना कधी पकडणार, याचा शासनाला जाब विचारणारी मोहीम राबविण्यात आली. शासनाचा नाकर्तेपणा, दिरंगाई यावर बोट ठेवणारे हजारो मेसेज सोशल मीडियातून व्हायरल करण्यात आले. त्याला महाराष्टÑासह देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

अंनिस ट्रस्टची नोंदणी रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साताºयाच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालात गंभीर निरीक्षणे नोंदविल्याने अंनिसच्या ट्रस्टकडून गैरव्यवहार झाल्याचे दिसत आहे. अंनिसच्या न्यासाचे विशेष लेखापरिक्षण करण्याची शिफारसही त्यांनी केली आहे. त्यामुळे इतरांना ‘जवाब दो’ म्हणणाºया विवेकवाद्यांनी राज्याच्या जनतेला जवाब द्यायला हवा, असे मत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी व्यक्त केले.
अंनिसची नोंदणी रद्द करण्याची मागणी घेऊन हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी स्वा. सावरकर स्मारकावर रविवारी संध्याकाळी आंदोलन केले. पुरोगामी विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांनी त्यांची वसुधा मनोविकास प्रतिष्ठानची सर्व मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये विलीन केली होती.
खुद्द डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी तसा जवाब स्वत:च्या स्वाक्षरीने २०१२ मध्ये दिला होता. प्रत्यक्षात ही सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांची मालमत्ता गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत मालमत्तेच्या वादामधून दाभोलकरांची हत्या झाली नाही ना, याचा तपास गुन्हे अन्वेषण यंत्रणेने आणि शासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली.
अंनिसच्या ट्रस्टमध्ये आर्थिक घोटाळे झाले आहेत. हत्येमागे आर्थिक हितसंबंध कारणीभूत आहेत का, दाभोलकरांनी जवाब दिल्यानंतर त्यांची हत्या झाली आहे का, या महत्त्वाच्या मुद्यांचा तपासच झालेला नाही. त्यांचे खुनी पकडायचे असतील तर सर्व बाजुंनी तपास होणे आवश्यक आहे. त्यांच्या ट्रस्टची चौकशी करण्यास ट्रस्टी का टाळाटाळ करीत आहेत, असा प्रश्न वर्तक यांनी उपस्थित केला.
विवेकवादाचा बुरखा पांघरून दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी दबाव निर्माण करण्यासाठी राज्यभर ‘जवाब दो’ आंदोलन करणाºया अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्यांच्या ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यांविषयी सर्वजण गप्प का
आहेत. दाभोलकरांवर श्रद्धा ठेवून अंनिसला दान करणाºयांचा पैसा जातो कुठे, असा सवाल हिंदू जनजागृती समितीने उपस्थित केला आहे.
यावेळी अधिवक्ता मोहन डोंगरे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, गार्गी
फाउंडेशनचे विजय गावडे, समितीचे
पराग गोखले उपस्थित होते. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अंनिसला
उद्देशून त्यांच्या गैरप्रकारांचेच जवाब
दो अशा हातामध्ये फलक घेऊन
घोषणा दिल्या.

हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, गार्गी फाउंडेशन व अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सावरकर स्मारक येथे रविवारी संध्याकाळी महाराष्टÑ अंनिसविरोधात आंदोलन केले.

Web Title: Anis and Hindu activist organizations, in the face of this, Dr. Narendra Dabholkar Memorial Day: Annis Prohibition Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.