शिल्पकारांना आध्यात्मिक बैैठक असावी - विवेक खटावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:16 AM2017-08-12T02:16:11+5:302017-08-12T02:16:11+5:30

पर्यावरणपूरकतेचे संस्कार मुलांवर शालेय स्तरापासून होणे गरजेचे आहे. कलाकारांनी उत्सवाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यातून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकेल, असे मत ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 Architect should have a spiritual stature - Vivek Khatavkar | शिल्पकारांना आध्यात्मिक बैैठक असावी - विवेक खटावकर

शिल्पकारांना आध्यात्मिक बैैठक असावी - विवेक खटावकर

Next

गणेशोत्सव हा समृद्ध कलेचा उत्सव असतो. शिल्प, मूर्ती घडवत असताना कलाकाराने मूर्तिशास्त्र अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण, रेखाटन, कलाकुसर आदी बाबींचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते. शिल्पकाराला वैैचारिक बैैठकीबरोबरच आध्यात्मिक बैैठकही असायला हवी. शिल्पकारांनी पर्यावरणपूरक विचार करणे गरजेचे असते. पर्यावरणपूरकतेचे संस्कार मुलांवर शालेय स्तरापासून होणे गरजेचे आहे. कलाकारांनी उत्सवाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यातून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकेल, असे मत ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

गणेशोत्सव हा समृद्ध कलेचा उत्सव असतो. गणरायाला ६४ कलांचा अधिपती म्हणून संबोधले जाते. या उत्सवामध्ये प्रत्येक कला समृद्ध होत असते. कलेची समृद्धी दर्शवणारा हा संपन्न उत्सव आहे. या माध्यमातून शिल्पकार, मूर्तिकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध होते. गणेशोत्सव कलाकारांना उदंड अनुभव मिळवून देतो. उत्सवात कोणतेही काम नेटाने करण्याची सवय लागली की कलाकाराची घोडदौैड कोणीही रोखू शकत नाही. शिल्पकारांना कामात शिस्त लागणे, वेळेवर काम पूर्ण करणे, वेळेची मर्यादा पाळणे, कामाचे परिपूर्ण नियोजन आदी गुण अंगी बाणवले जातात.
काळाच्या ओघात शिल्पकला, मूर्तिकलेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. मात्र, सजावटीच्या क्षेत्रात येणाºया पदवीधारक कलाकारांची संख्या कमी होत आहे. पूर्वीपासून सजावट क्षेत्रात काम करणाºया कलाकारांना समाजात कमी लेखले जाते. त्यामुळे पदवीधारकांपेक्षा काम करत करत शिकणाºया कलाकारांची संख्या जास्त आहे. शिल्पकारांनी या क्षेत्रात कार्यरत असताना मूर्तिशास्त्राचा अभ्यास, बारकाईने निरीक्षण, शिल्पकला आणि मूर्तिकला यातील फरक सूक्ष्मपणे जाणून घेणे आवश्यक असते.
मला वडिलांकडून (डी. एस. खटावकर) शिल्पकलेचे बाळकडू मिळाले. जे.जे. स्कूल आॅफ आर्टमधून जी. डी. आर्टचे शिक्षण घेतल्यानंतर गणेशोत्सवात काम करण्याची संधी मिळाली. या उत्सवाने मला घडवले आणि समृद्ध केले, कामातील शिस्त शिकवली. सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधता आला, त्यांच्याकडून कामातील चुका उमगल्या आणि स्वत:मध्ये सुधारणा करता आली. कलाकार स्वमग्नतेने काम करत असतो. त्यामुळे तो समाजापासून, सामान्यांपासून दूर असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कलाकारांना अनेकांशी संवाद साधता येतो. सामोपचाराच्या भूमिकेतून काम करत असताना निश्चितपणे यश मिळते. नागेश शिंपी हे मूर्तिशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. त्यांच्याप्रमाणे गणेशोत्सव का साजरा केला जातो, त्यामागची भूमिका काय, मूर्तिशास्त्राचे महत्त्व याबाबतचा सखोल अभ्यास आजवर करण्यात आलेला नाही.
शिल्प किंवा मूर्ती घडवत असताना बैठक कशी असावी, याला या प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूर्तिशास्त्राची अनेक पुस्तके यासंदर्भात उपलब्ध आहेत. गणपतीची मूर्ती घडवताना पंचमहाभूतांची प्रतीके त्या मूर्तीमध्ये समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक असते. या प्रतीकांची योग्य मांडणी, प्रमाण, अभ्यासपूर्ण मूर्ती असे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचे वर्णन करता येईल. हेमाडपंती, पेशवाई अशी विविधांगी बैैठक असलेल्या सर्वांगसुंदर मूर्ती मन प्रसन्न करतात. यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासाठी ब्रह्मणस्पती मंदिराची सजावट करण्यात येत आहे. नागर, द्राविड अशा विविध मंदिरशैैली अस्तित्वात असताना वेगळ्या पद्धतीची रचना करण्याच्या दृष्टीने हा विषय निवडण्यात आला आहे. गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौैप्यमहोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे, ही भाग्याची गोष्ट आहे.
गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुरूप बदलत आहे. शिल्पकलेमध्येही नवीन तंत्रज्ञान येत आहे. फायबर ग्लासप्रमाणेच सध्या वजनाने हलक्या असणाºया पॉलीयुरेथिन फोमचा वापरही करता येऊ शकतो. शिल्पकारांनी पर्यावरणपूरक विचार करणे गरजेचे असते. पर्यावरणपूरकतेचे संस्कार मुलांवर शालेय स्तरापासून होणे गरजेचे आहे. कलाकारांनी उत्सवाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने करायला हवा. त्यातून समृद्धीकडे वाटचाल होऊ शकेल.

Web Title:  Architect should have a spiritual stature - Vivek Khatavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.