झुणका-भाकरीचा वारकऱ्यांनी घेतला आस्वाद
By Admin | Published: June 30, 2017 03:28 AM2017-06-30T03:28:08+5:302017-06-30T03:29:26+5:30
संत सोपान काका व संत संतराज महाराज पालखी सोहळ्यांचे निर-निमगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना येथील ग्रामस्थांनी दिलेल्या झुणका-भाकरीने वारकरी तृप्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बावडा : संत सोपान काका व संत संतराज महाराज पालखी सोहळ्यांचे निर-निमगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना येथील ग्रामस्थांनी दिलेल्या झुणका-भाकरीने वारकरी तृप्त झाले.
संत सोपान काका व संतराज महाराज पालखी सोहळा आज दुपारी निर-निमगाव येथील चौकात आल्यानंतर निर-निमगाव, भाऊसाहेब नगर, बावडा परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्यातील विश्वस्त गोपाळ महाराज गोसावी, श्रीकांत महाराज गोसावी आदींचा सन्मान अनंतराव पवार विद्यालयाच्या व निर-निमगाव ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी घोगरे, सरपंच सुनिता खरात, उपसरपंच जोतिराम देवडे, गणपत देवडे, आशोक जाधव, ग्रामसेविका अंबिका पावसे आदींच्या हस्ते करण्यात आला.