घायवळ टोळीतील गुंडाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

By admin | Published: December 1, 2014 03:37 AM2014-12-01T03:37:38+5:302014-12-01T03:37:38+5:30

नीलेश घायवळ टोळीच्या तीन गुंडांवर वैकुंठ स्मशानभूमीबाहेर हल्ला करून एकाचा खून केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कुख्यात गजा मारणे टोळीच्या दोन जणांना अटक केली

Both of them were arrested in connection with the murder of gangster gangster gang | घायवळ टोळीतील गुंडाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

घायवळ टोळीतील गुंडाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Next

पुणे : नीलेश घायवळ टोळीच्या तीन गुंडांवर वैकुंठ स्मशानभूमीबाहेर हल्ला करून एकाचा खून केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कुख्यात गजा मारणे टोळीच्या दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी भाऊ-भाऊ असून न्यायालयाने त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
विशाल ऊर्फ गोट्या श्रीरंग डिंबळे (वय २५) आणि सागर श्रीरंग डिंबळे (वय २४, दोघेही रा. लडकतवाडी, दत्तवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी संतोष नागू कांबळे (वय २७, रा. दत्तवाडी) याने फिर्याद दिली आहे. आरोपींनी अमोल हरी बधे (वय ३२, रा. दत्तवाडी) याचा शनिवारी गोळ्या झाडून खून केला होता. विशाल याला पहाटेच्या सुमारास तर सागर याला सकाळी साडेनऊच्या सुमारास अटक केली. अमोल बधे, कांबळे आणि लखन लोखंडे हे तिघेही वैकुंठ स्मशानभूमीमध्ये गेले होते. अंत्यविधी उरकून स्मशानभूमीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या दुचाकीला मोटारीने जोरात धडक देऊन खाली पाडले. दुचाकीवरून आलेल्या रूपेश मारणे आणि सागर रजपूत यांनी कांबळेवर गोळ्या झाडल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them were arrested in connection with the murder of gangster gangster gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.