नदीत बुडालेला चिमुरडा अद्याप बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 08:30 PM2018-06-28T20:30:06+5:302018-06-28T20:31:50+5:30
सायकल खेळताना नदीत बुडालेल्या विराट काची या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा दुसऱ्या दिवशीही शाेध लागू शकला नाही.
पुणे : सायकल खेळत असताना उतारावरुन सायकल घसरल्याने थेट नदीत गेलेला पाच वर्षाच्या चिमुरड्याचा शाेध दुसऱ्या दिवशीही लागू शकला नाही. अग्निशाक दलाकडून दुसऱ्या दिवशी घेतलेल्या शाेधात काहीच हाती लागले नाही.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास विराट प्रसाद काची (वय 5) हा सायकल खेळत असताना त्याची सायकल उतारावरुन घसरुन थेट नदीत गेली. यात विराट नदीत बुडाला. ही घटना सीअाेईपीच्या मागील बाजूस बाेट क्लब जवळ घडली. अग्निशामक दलाच्या जवानांकडून विराटचा कसून शाेध घेण्यात अाला, परंतु बुधवारी रात्री उशीरापर्यंत त्याचा शाेध लागू शकला नाही. गुरुवारी पुन्हा सकाळ पासूनच अग्निशामक दलाचे 10 जवान विराटचा शाेध घेत हाेते. परंतु त्यांच्या हाती निराशाच अाली.
बुधवारी विराट हा त्याचा चुलतभाऊ सूरज काची याच्यासाेबत सकाळी घराजवळ खेळत हाेता. त्याचे अाजाेबा गाेपीचंद्र हे नेहमीप्रमाणे नदीकडे जात असताना विराट खेळण्याच्या सायकलवरुन भाऊ सूरज याच्यासाेबत जात असताना अचानक विराटची सायकल उतारावरुन थेट नदीपात्रात गेली. विराट नदीपात्रात बुडाल्याची माहिती त्याचा चूलतभाऊ सूरज याने घरी जाऊन सांगितली. स्थानिकक नागरिक व काची कुटुंबीयांतील सदस्यांनी नदीपात्रात थेट उतरुन विराटचा शाेध सुरु केला. घटनास्थळी तातडीने येरवडा अाणि भवानी पेठ अग्निशामक दलाचे कर्मचारीदेखील हजर झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तसेच नावेच्या साह्याने बुधवारी रात्रीपर्यंत विराटचा शाेध घेतला. मात्र त्याचा शाेध लागला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा अग्निशामक दलाकडून शाेध माेहिम राबविण्यात अाली. परंतु विराटचा शाेध लागू शकला नाही.
दरम्यान शुक्रवारी पुन्हा अग्निशामक दलाकडून विराटचा शाेध घेण्यात येणार अाहे.