मिरची 30 ते 40 रुपये किलो, काळ्यापाठीच्या मिरचीच्या दरात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 01:33 PM2018-01-14T13:33:58+5:302018-01-14T13:34:48+5:30
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी महाराष्ट्रासह परराज्यातून 15 ते 16 टेम्पो मिरचीची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत काळ्यापाठीच्या मिरचीच्या दारात काही प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मिरचीला 30 ते 40 रुपये किलो दर मिळाला.
पुणे: गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी महाराष्ट्रासह परराज्यातून 15 ते 16 टेम्पो मिरचीची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत काळ्यापाठीच्या मिरचीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मिरचीला 30 ते 40 रुपये किलो दर मिळाला.
मार्केट यार्डातील व्यापारी विलास भुजबळ म्हणाले, मिरचीचे दर स्थिर असून त्यात कोणतीही मोठी दर वाढ झाली. रविवारी पुण्यात मध्यप्रदेश , गुजरात, राजस्थान या परराज्यातून तर पुणे परिसरातील शिरूर, हवेली, पुरंदर या ठिकाणीहून मिरचीची आवक झाली.
भोगी व रविवारी संक्रांत आल्याने मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घडली.ग्राहकाच नसल्याने आवक कमी झाली असलीतरी भाज्यांचे दर स्थिर आहेत. फलाभाज्याप्रमाणे पाले भाज्यांचे दरही स्थिर राहिले. रविवारी बाजारात दीड लाख कोथिंबिरीच्या जुडीची आवक झाली. दरम्यान,
जिल्हयात थंडी कमी झाल्याने मार्केटयार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. संक्रांतीमुळे आवकेप्रमाणेच मागणी कायम असल्याने दर स्थिर आहेत. सध्यस्थितीत महिला वर्गाकडून गज-याला मागणी वाढल्याने गज-याची फुले तसेच कोकणातून आस्टर ढाकळीच्या मोठी मागणी होत आहे. रथसप्तमीपर्यंत ही मागणी कायम राहील अशी माहिती व्यापा-यांनी दिली.