नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणार! झिरो पेंडन्सी अभियान राबविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 03:22 PM2017-10-07T15:22:12+5:302017-10-07T15:23:42+5:30
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ
पुणे : 'झिरो पेंडन्सी' अभियान राज्यभर राबविले जाणार असून त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच प्रसिध्द केला जाईल. त्यातून शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी स्पर्धा लावून त्यावर लक्ष ठेवले जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी फडणवीस बोलत होते. याप्रसंगी महसूल व सार्वजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव अढाळरा पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.
पुण्यातील झिरो पेंडेन्सी अभियानाचे फडणवीस यानी कौतुक केले. तसेच नूतन इमारतील फर्निचरसाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिले.
पुढे ते म्हणाले, की झिरो पेंडेन्सी केवळ कागदावर नाही तर अधिकारी व कर्मचारी यांचा अविभाज्य भाग व्हावा. केवळ इमारतीची भव्यता असून उपयोगाची नाही. काम करणार्या अधिकारी व कर्मचाºयाच्या मनाची भव्यता मोठी असली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक समाधानी होवून बाहेर पडला पाहिजे.