भीमा नदीतील वाळू उपसा बंद करा
By admin | Published: June 10, 2015 04:41 AM2015-06-10T04:41:58+5:302015-06-10T04:41:58+5:30
पेडगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रातून होत असलेला बेकायदा वाळू उपसा बंद करण्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार उत्तम दिघे यांना दिले आहे.
देऊळगावराजे : पेडगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रातून होत असलेला बेकायदा वाळू उपसा बंद करण्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार उत्तम दिघे यांना दिले आहे.
येथील भीमानदी पात्रात शासकीय वाळू उपशाचा लिलाव झालेला नसतानाही महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. तर, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ वाळूचे उत्खन्न चालू आहे. त्यामुळे बंधाऱ्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच, येथील पानवकरवस्ती येथेही बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. येथील रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत झाला असून, वाळूमाफियांच्या उच्छादामुळे रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. तर, गावातून वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याने ग्रामस्थांना अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. (वार्ताहर)
४वाळू उपसा करणारे ग्रामस्थांना धमक्या देत असून, गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित दोषींवर कारवाई करावी; अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.