उत्सवात नारळांची अडीच कोटींची उलाढाल; आठ दिवसांत शहरात १५ ते २० लाख विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 05:53 AM2017-09-26T05:53:18+5:302017-09-26T05:53:45+5:30
नवरात्रोत्सवामुळे प्रत्येक घरामध्ये घटस्थापनेसाठी नारळ वापरला जातो. तसेच दसºयासाठीदेखील नारळाला मोठी मागणी असते. यामुळे गेल्या आठ दिवसांत शहरामध्ये तब्बल १५ ते २० लाख नारळांची विक्री झाली आहे.
पुणे : नवरात्रोत्सवामुळे प्रत्येक घरामध्ये घटस्थापनेसाठी नारळ वापरला जातो. तसेच दसºयासाठीदेखील नारळाला मोठी मागणी असते. यामुळे गेल्या आठ दिवसांत शहरामध्ये तब्बल १५ ते २० लाख नारळांची विक्री झाली आहे. यामधून तब्बल अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली़
गणेशोत्सवानंतर नारळास नवरात्रोत्सवात सर्वाधिक मागणी असते़ नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी नव्या, तर सुरू झाल्यावर जुन्या नारळाला अधिक मागणी असते़ नवा नारळ हा तोरणासोबतच पूजेसाठी वापरला जातो, तर जुना नारळ हा दसºयादिवशी वापरला जात असल्याचे सांगण्यात आले़
राज्यासह देशभरात सर्वत्रच दसºयाचे महत्त्व मोठे आहे़ अनेक कंपन्यांमध्ये यंत्राच्या पूजनासाठी नारळाचा वापर केला जातो़ उत्तर व दक्षिण भारतातील नागरिक सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत़ त्या ठिकाणी दसºयाला विशेष महत्त्व असल्याने येथेही नारळाला अधिक मागणी असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. पुण्यात चतु:शृंगी, तांबडी जोगेश्वरी, महालक्ष्मी, भवानी माता, तळजाईमाता यांसह अनेक प्रसिद्ध देवींची मंदिरे आहेत़ त्यामुळे येथे दर्शनाला येणारे भाविक देवीची खणा-नारळाने ओटी भरण्याची परंपरा आहे़ त्यामुळे नवरात्रोत्सवादरम्यान शहरात १५ ते २० लाख नारळांची विक्री झाली असून त्यांची उलाढाल तब्बल दोन ते अडीच कोटी रुपयांच्या घरात गेली असल्याचेही बोरा यांनी सांगितले़
तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नारळाची आवक होते़ गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा उत्पादनात तब्बल ६० टक्क्यांनी घट झाली आहे़ त्यामुळे दरामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे़ सध्या बाजारात आवक होणारा नारळ हा साठवणुकीतील आहे़ नवीन हंगाम फेब्रुवारीमध्ये सुरू होतो़ - दीपक बोरा, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर