तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट करणाऱ्या तरुणास सायबर क्राईम सेलने पुण्यात केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 06:42 PM2017-12-09T18:42:28+5:302017-12-09T18:46:20+5:30

एका उच्च शिक्षित तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेलने तरुणाला अटक केली आहे.

The cyber-crime cell has been arrested person in Pune for the fake Facebook account of the girl | तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट करणाऱ्या तरुणास सायबर क्राईम सेलने पुण्यात केली अटक

तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट करणाऱ्या तरुणास सायबर क्राईम सेलने पुण्यात केली अटक

Next
ठळक मुद्देआरोपी व पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे, झाला होता वैयक्तिक वादआपले फोटो शेअर करताना काळजी घ्यावी़ : सायबर क्राईम सेल

पुणे : कात्रज भागात राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणीला रात्री अपरात्री वेगवेगळ्या व्यक्तींचे फोन येऊ लागल्याने ती हैराण झाली़ फोनवरील व्यक्तीला माझा नंबर कोणी दिला अशी या तरुणीने चौकशी केल्यावर तुमच्या नावाचे फेसबुक अकाऊंट असून त्यावर तुमचा फोटो व मोबाईल नंबर असल्याचे तिला सांगण्यात आले़ दुसऱ्या दिवशी या तरुणीने सायबर कॅफेमध्ये जाऊन स्वत:चे फेसबुक अकाऊंट चेक केल्यावर तिच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट व त्यावर तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड केल्याचे दिसून आले़ सायबर क्राईम सेलने याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे़ 
नितीन दत्तात्रय बंड (वय २८, रा़ जळगाव जामोद, जि़ बुलढाणा) असे या तरुणाचे नाव आहे़ भारती विद्यापीठ पोलिसांकडे या तरुणीने फिर्याद दिली आहे़ 
सायबर क्राईम सेल यांच्या मार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता़ त्यानुसार या सेलने पीडित तरुणीच्या फेसबुकबाबतची माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण केले़ त्यावरुन हे बनावट अकाऊंट नितीन बंड याने तयार केलेल्या निष्पन्न झाले़ त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली़ तेव्हा हा आरोपी व पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत़ त्यांच्या वैयक्तिक वाद झाला होता़ त्यातून बदनामी करण्यासाठी त्याने तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले व त्यावर तिचा फोटो व मोबाईल नंबरही अपलोड केला होता़ 
ही कामगिरी सायबर क्राईम सेलच्या पोलीस उपनिरीक्षक सोनाली फटांगरे, पोलीस नाईक अजित कुरे, नितेश बिचेवार, शुभांगी मालुसरे यांनी केली़ 
फेसबुक या सोशल वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यातून तरुणींना त्रास देण्याचा प्रकार वाढू लागले आहेत़ त्यामुळे आपले फोटो शेअर करताना काळजी घ्यावी़ आपल्यासोबत किंवा आपल्याजवळील व्यक्तींसोबत असा काही प्रकार झाल्यास सायबर क्राईम सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़ 

Web Title: The cyber-crime cell has been arrested person in Pune for the fake Facebook account of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.