काेंढव्यात सिलेंडरचा स्फाेट, ज्येष्ठ महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:44 PM2018-05-20T14:44:56+5:302018-05-20T14:44:56+5:30
गॅस लीक झाल्याने सिलेंडरचा स्फाेट हाेऊन घरातील सामानाला अाग लागल्याची घटना काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीत घडली. या स्फाेटात एक महिला जखमी झाली अाहे.
पुणे : काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फाेट हाेऊन एक ज्येष्ठ महिला जखमी झाली अाहे. रविवारी दुपारी साडेअाकराच्या सुमारास ही घटना घडली. सिलेंडरमधील गॅस घरात पसरल्याने त्याचा स्फाेट झाला. अग्निशामक जवानांनी धाव घेत जखमी महिलेला नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.
नरगीस अब्दुल राेफ पटेल (वय 73) ह्या या अागीत जखमी झाल्या अाहेत. त्यांना सूर्या हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात अाले अाहे. तर त्यांचे पती अब्दुल राेफ पटेल यांना किरकाेळ जखमा झाल्या अाहेत. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेअाकराच्या सुमारास अग्निशामक दलाला सिलेंडरचा स्फाेट झाल्याचा फाेन अाला. घरात पटेल नवरा-बायकाे दाेघेच राहतात. वयाेमानामुळे घरात गॅस लीक झाल्याचे दांपत्याच्या लक्षात अाले नसावे. त्यांनी कुठलेतरी इलेक्ट्राॅनिक उपकरण सुरु केल्यामुळे सिलेंडरचा स्फाेट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. हा स्फाेट इतका भीषण हाेता की त्याच्या हादऱ्याने इमारतीखाली असलेल्या एका कारची काच फुटली. तसेच घरातील इतर सामानाचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. सिलेंडरच्या स्फाेटामुळे घरातील पडद्यांना व कपड्यांना अाग लागली हाेती. तसेच बाल्कणीतल्या प्लॅस्टिकच्या पत्र्यांना अागीने घेरले हाेते. शेजारील नागरिकांनी पाण्याचा मारा करत अाग विझवण्याची प्रयत्न केला. बाल्कणीतल्या पत्र्याला लागलेल्या अागीमुळे वरच्या फ्लॅटमधील बाल्कणीमधील काही वस्तूंना अाग लागली. पटेल यांच्या अाजूबाजूच्या फ्लॅटचेही या स्फाेटामुळे काहीप्रमाणात नुकसान झाले.
स्फाेटाची माहिती मिळाल्यानंतर काेंढव्यातील दाेन फायर गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. घुमसत असलेली अाग विझवत जवानांनी जखमी नरगीस पटेल यांना रुग्णालयात दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत काेंढव्याचे स्टेशन अाॅफिसर प्रभाकर उमराटकर घटनास्थळी दाखल झाले.