पोलिसांचे मॉकड्रिल अन् गुंडांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Published: June 2, 2017 02:16 AM2017-06-02T02:16:22+5:302017-06-02T02:16:22+5:30

वर्षातून एक दोन वेळा पोलिसांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) होत असते. गर्दी आणि वर्दळीचे ठिकाण निवडून पोलीस मॉकड्रिल करतात.

The demonstration of the police's mockedrill and gooseberries | पोलिसांचे मॉकड्रिल अन् गुंडांचे शक्तिप्रदर्शन

पोलिसांचे मॉकड्रिल अन् गुंडांचे शक्तिप्रदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वर्षातून एक दोन वेळा पोलिसांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) होत असते. गर्दी आणि वर्दळीचे ठिकाण निवडून पोलीस मॉकड्रिल करतात. मॉक ड्रिलच्या माध्यमातून कायदा, सुव्यवस्था यंत्रणा दक्ष असल्याचे पोलीस दाखवतात. तर नागरिकांवर दहशत राहावी, यासाठी गुंड टोळक्याने फिरून शक्तिप्रदर्शन घडवू लागल्याचे चित्र शहरात पहावयास मिळू लागले आहे.
मोरवाडीतील एका मॉलजवळ शनिवारी पोलिसांनी मॉकड्रिल केले. अतिरेक्यांना पकडण्याचे त्यांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) सुरू असताना पिंपरीत गुंडांचे टोळके फेरफटका मारत होते. उंच, तगडे सहकारी घेऊन ते परिसरातून फेरफटका मारून शक्तिप्रदर्शन करीत होते. एकाचवेळी संपूर्ण रस्ता अडवून चालत जाणाऱ्या या टोळक्याकडे या मार्गाने ये-जा करणारे पाहात होते. सुरुवातीला काहीतरी गडबड झाली असावी, भांडणाच्या इराद्याने हे टोळके आले असावे, असे नागरिकांना वाटले. परंतु, भांडणाचा काही प्रकार नव्हता. टोळके असेच फेरफटका मारत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर गुंडही आता स्वत:चे प्रमोशन करू लागले आहेत. कोणातरी डॉनचे छायाचित्र बाजूला आपली छबी झळकावून ते गुंडगिरीचे प्रदर्शन करू लागले आहेत.
गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असलेला त्यांचा मित्रपरिवार त्यांना लार्इ््क देऊ लागला आहे. त्यावर कमेंटसही तशाच पडत आहेत. कोणी स्वत:ला वाघ तर कोणी सिंह संबोधू लागला आहे. तरुण मुले अशा ग्रुपवर अधिक सक्रिय झाली असून डॉन,भाई,दादा यांना ते आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर प्रमोशन करणारे काही गुंड नागरी वस्तीच्या परिसरात अनेकदा दहशत पसरविण्याची कृत्य करू लागले आहेत.

वाहनांची तोडफोड, जाळपोळीचे प्रात्यक्षिक
मॉकड्रिलच्या माध्यमातून पोलीस सतर्क असल्याचे दाखवून देत असताना, गुंडांची टोळकी मात्र दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ याची खरी प्रात्यक्षिके दाखवू लागले आहेत. शहरात घडलेल्या विविध ठिकाणच्या दहशतीच्या घटनांमध्ये आतापर्यंत दोनशेहून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. मॉकड्रिल करणारे पोलीस बाहेरून येणाऱ्या खऱ्या दहशतवाद्यांनाही पकडतील, परंतु बाहेरच्या दहशतवाद्यांपेक्षा नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या स्थानिक गुंडांवर पोलिसांचा वचक कधी तयार होईल? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: The demonstration of the police's mockedrill and gooseberries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.