दिपक मानकर, साधना वर्तक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल :मानकरांच्या अडचणीत आणखी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 05:08 PM2018-10-28T17:08:48+5:302018-10-28T17:10:55+5:30

सामाजिक कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याप्रकरणा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Dipak Mankar, Sadhana Vartak has filed a cheating case | दिपक मानकर, साधना वर्तक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल :मानकरांच्या अडचणीत आणखी वाढ

दिपक मानकर, साधना वर्तक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल :मानकरांच्या अडचणीत आणखी वाढ

googlenewsNext

पुणे : सामाजिक कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याप्रकरणा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मानकर यांच्यासह तिघांवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कोट्यवधींची फसवणूक केल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          आदिती माधव दिक्षीत (वय ५२, रा. लक्ष्मी निवास, प्रभात रोड, डेक्कन) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक माधवराव मानकर (रा. भांडारकर रोड, पुणे), साधना वर्तक (रा. कोथरूड) आणि मुकुंद परशुराम दिक्षीत (रा. कोथरूड) यांच्याविरूध्द भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  २०१३ ते सन २०१८ दरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकर, वर्तक आणि दिक्षीत यांनी संगणमत करून फिर्यादी दिक्षीत फसवणूक केली. फिर्यादींच्या हिस्स्याची शिवाजीनगर आणि पिंपरी वाघीरे-पुणे कॅनॉल रोड-साधु वासवानी चौक येथील जमीन मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करून त्याची तिस-या व्यक्तीला विक्री केली. त्यातून मिळालेला पैसा फिर्यादी यांना दिला नाही. मानकर, वर्तक आणि मुकुंद दिक्षीत यांनी जमिनीच्या विक्रीतुन मिळालेल्या रक्कमेचा गैरव्यवहार घेतला आणि फिर्यादीची कोटयावधी रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे फिर्यादी यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) खटके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

           मानकर यांच्यावर जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना मानकर यांना त्रास होऊ लागल्याने सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Dipak Mankar, Sadhana Vartak has filed a cheating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.