पुण्याचा हा इतिहास तुम्हाला माहितीये का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 05:53 PM2018-11-17T17:53:06+5:302018-11-17T17:53:52+5:30

पुण्याच्या नावांमध्ये अनेक बदल हाेत गेले. ते बदल नेमके कधी झाले अाणि पुण्याच्या नावांचा प्रवास कसा हाेता जाणून घेऊयात

Do you know this history of Pune? | पुण्याचा हा इतिहास तुम्हाला माहितीये का ?

पुण्याचा हा इतिहास तुम्हाला माहितीये का ?

googlenewsNext

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे नाव बदलून जिजापूर करावं अशी मागणी जाेर धरत अाहे. भारतातील महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याला अाेळखलं जातं. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर पुण्याला भारतातील सर्वाेत्तम शहर करण्याची घाेषणा केली अाहे. अशा या पुण्याचा वैभवशाली इतिहास तुम्हाला माहित अाहे का. पुण्याच्या नावांमध्ये अनेक बदल हाेत गेले. ते बदल नेमके कधी झाले अाणि पुण्याच्या नावांचा प्रवास कसा हाेता जाणून घेऊयात 
- सन 754  :  याकाळी पुण्याचे नाव हे पुण्य-विजय असे हाेते. त्याकाळच्या ताम्रपटांमध्ये असा उल्लेख अाढळताे. 

- सन 993   : या काळी पुण्याचे नाव पुण्य-विजय बदलून पुनवडी असे झाले. 

- सन 1600  :  पुण्याच्या मूळ वस्तीला कसबा पुणे असे नाव हाेते. 

- सन 1637  :  पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली, साेमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या. 

- सन 1656  :  पुणे शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली हाेते. 

- सन 1663  : मंगळवार पेठ वसली. 

- सन 1703  :  बुधवार पेठ वसली. 

- सन 1714  :  पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरु

- सन 1730  :  शनिवारवाडा बांधून पुर्ण झाला. 

- सन 1734  : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसवली. 

- सन 1749  :  पर्वतीवरील देवालय बांधले. 

- सन 1756   :  गणेश व नारायण पेठा वसवल्या. 

- सन 1761  : लकडी पूल बांधण्यात अाला. 

- सन 1769  :  सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या. 

- सन 1774  :  नाना, रास्ता व घाेरपडे पेठा वसवल्या. 

- सन 1818  :  इंग्रजी अंमल सुरु, खडकी कटक स्थापना

- सन 1857  :  पुणे नगरपालिकेची स्थापना.

- सन 1869  :  सर डेव्हिड ससून रुग्णालय कार्यान्वित 

- सन 1880  : खडकवासला धरण बांधून पूर्ण 

- सन 1881 ते 1891  : मुठा उजवा कालवा खाेदण्यात अाला. 

- सन 1884  :  डेक्कन काॅलेजची स्थापना

- सन 1885  :  फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना

- सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला.

- सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले.

- सन 1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.

- सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू. नव्या पुलाचे बांधकाम.

- सन 1941 : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्टतर्फे नागरी बससेवा सुरू.

- सन 1950 : पुणे महानगरपालिकेची स्थापना. पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू.

- सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.

- सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू.

- सन 1961 : पानशेत धरण फुटले.

- सन 1973 : सिंहगडावर टी.व्ही. टॉवर सुरू झाला. पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.

Web Title: Do you know this history of Pune?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.