पर्यावरण चित्रपटांना व्यासपीठ हवे, नल्लामुथ्थू यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:34 AM2018-01-05T03:34:02+5:302018-01-05T03:34:33+5:30

डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

 Environmental films should have a platform, Nallamuththu's Khant | पर्यावरण चित्रपटांना व्यासपीठ हवे, नल्लामुथ्थू यांची खंत

पर्यावरण चित्रपटांना व्यासपीठ हवे, नल्लामुथ्थू यांची खंत

googlenewsNext

पुणे - डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. आॅनलाईनच्या जमान्यात चित्रपट, माहितीपट हे माध्यम सर्वांत प्रभावी ठरू शकते. मात्र, भारतामध्ये पर्यावरण, वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नाही, अशी खंत दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थू यांनी गुरुवारी व्यक्त केली.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक आणि छायाचित्रकार नल्लामुथ्थू यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी पार पडले. यावेळी माधव चंद्रचूड, महोत्सवाचे अध्यक्ष वीरेंद्र चित्राव, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, परिणीता दांडेकर, गुरमित सपल, विभूती देववर्मा उपस्थित होते.
विभूती देववर्मा यांना (संस्था), गुरमीत सपल (चित्रपट निमार्ता), परिणिता दांडेकर (कार्यकर्त्या) यांना यावेळी किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
विभूती देववर्मा म्हणाले, ‘जंगलात राहून जंगल वाचवून संशोधन, जतन आणि संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम सुरू करताना प्रारंभी खूप अडचणी आल्या. मात्र, हळूहळू बरेच तरुण पुढे येऊ लागले. लहानसहान प्रकल्पांमधून पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे, हाच मूळ उद्देश आहे. त्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत.’
गुरमीत सपल म्हणाले, ‘चित्रपट निर्माता म्हणून पर्यावरण आणि वन्यजीवनाशी खूप जवळचा संबध आला. आजकाल सकाळी उठल्या उठल्या पर्यावरणाचा ºहास झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. पृथ्वीवरील आपले भविष्य असुरक्षित आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर कलेतून जनजागृती घडवणे आवश्यक आहे. यातून भविष्यात चांगले परिणाम पहायला मिळतील, अशी आशा वाटते.’ परिणीता दांडेकर म्हणाल्या, ‘नद्या या पृथ्वीच्या वाहिन्या आहेत. मेट्रो, बंधारे, रस्ते अशा अडथळ्यांनी नद्यांवर आक्रमण केले जात आहे. जीवित नदी हे नागरीकरणाचे आणि जीवित जगाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांचे जतन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.’
 

Web Title:  Environmental films should have a platform, Nallamuththu's Khant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.