पुण्यातील ही ठिकाणं ट्रेकींंगसाठी नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 11:32 AM2017-11-06T11:32:09+5:302017-11-06T11:51:57+5:30

नेहमीचेच रस्ते धुंडाळण्यापेक्षा पर्यटकांना जरा हटके ठिकणी जाण्याची इच्छा असते. आता ही हटके ठिकाणं शोधायची कुठे?

Exactly try to trekking these places in Pune | पुण्यातील ही ठिकाणं ट्रेकींंगसाठी नक्की ट्राय करा

पुण्यातील ही ठिकाणं ट्रेकींंगसाठी नक्की ट्राय करा

Next
ठळक मुद्देपुण्यात तसं पहायला गेलात तर तरुणांची संख्या फार मोठी आहे.सुट्टीच्या दिवशी पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसरातून फार पर्यटक येतात . ट्रेकींगसाठी ही हटके ठिकाणं शोधायची कुठे?

पुणे : पुण्यात तसं पहायला गेलात तर तरुणांची संख्या फार मोठी आहे. पुण्यात गेल्या काही दिवसात अनेक आयटी कंपन्या आणि विविध शैक्षणिक संस्था वाढत गेल्याने तरुणांचा ओघही वाढला.  देशातल्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळी येथे येत असतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसर फिरण्याची त्यांची फार आवड असेल. पण नेहमीचेच रस्ते धुंडाळण्यापेक्षा त्यांना जरा हटके ठिकणी जाण्याची इच्छा असते. आता ही हटके ठिकाणं शोधायची कुठे? आणि त्याठिकाणी जाऊन त्यांना काय काय पाहायला आणि करायला मिळणार यासाठी त्यांची बरीच शोधाशोध सुरू असते. पुण्यातल्या आणि पुण्यापासून जवळ असलेल्या काही हटके डेस्टिशेन्सविषयी आज पाहुया.

लेण्याद्री

३० बौद्ध लेण्यांचा समूह म्हणजे लेण्याद्री. पुण्यातील कुकड नदीच्या किनारी हे गाव वसलेले आहे. या विभागाला गिरिजात्मज असंही म्हणतात.. कारण येथे मोठ्या प्रमाणात डोंगर अफाट पसरेललं आहे. आणि या डोंगरामध्ये जवळपास ३० लेण्या आढळतात. या लेण्यांवर पाण्याच्या टाक्याही आहेत. तसेच त्यातील काही टाक्यांवर शिलालेख लिहिलेलेही दिसतात.  असं म्हणतात की लेण्यांची निर्मिती पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात केलेली आहे. तसेच बौद्ध धर्मातील हीनयान पंथातील या लेण्या असल्याचे इतिहासात सांगण्यात आले आहे. येथे असलेलं मंदिर अखंड डोंगर खोदून तयार करण्यात आलेलं आहे. तसंच यातील सातव्या लेणीत अष्टविनायकमधील सहावा गणपतीही आहे. त्यामुळे हे सर्व लेण्या पाहता पाहता आपलं देवदर्शनही होतं आणि जुन्या काळातील बांधकामाचा प्रत्यक्ष अनुभवही घेता येतो. फोटोग्राफीसाठीही येथे तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात येतात. त्याचप्रमाणे येथे फेरफटका मारायचा म्हणजे छोटासा ट्रेक झाल्यासारखंच वाटतं.

पानशेत धरण

 १९६९  साली आलेल्या धरणामुळे हे धरण दृष्टीक्षेपास आले. पुण्याच्या ५० किलोमीटर अंतरावर असलेले हे धरण मातीचं बनलेलं आहे. आंबी नदीवर वसलेल्या या धरणाला तानाजीसागर असंही म्हटलं जातं. या नदीवर कायकिंग, स्विमिंग अशा खेळांचा आस्वाद घेता येतो. नदीच्या आजूबाजूला पसरलेलं निसर्गसौंदर्य पर्यटकांना येथे पुन्हा येण्यासाठी उत्सुक करतं.

ताम्हिणी घाट

मुळशी धरणापासून सुरू होऊन ओर्केड कॅफेच्या येथे संपणारा घाट म्हणजे ताम्हिणी घाट. कोकण आणि पुण्याला जोडणारा घाट म्हणूनही या घाटाला ओळखलं जातं. १५ किमी  लांब असलेल्या घाटावर अनेक धबधबे असून चहुकडे हिरवाईने मुक्त उधळण केलेलीही दिसून येते. काहीजण बाईक रायडींगसाठी येत असतात. तर काहीजण ट्रेकिंगच्या उद्देशाने या घाटावर प्रवेश करतात. पुण्यापासून हा घाट ११२ किलोमीटर आहे.

सिंहगड

सह्याद्रीच्या पूर्व दिशेला पसरलेल्या भुलेश्वरच्या रांगेत असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. पुण्यापासून २५ किमी अंतरावर हा सिंहगड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा मुलूख या गडावरून दिसतो. याच किल्ल्याला पूर्वी कोंढाणा असंही म्हटलं जायचं. तरुणांना ट्रेकिंगसाठी हा किल्ला उत्तमच.

हरिहरेश्वर

पुण्यापासून १९० किमी अंतरावर असलेल्या रायगड येथील हरिहरेश्वर मंदिराजवळील हा समुद्रकिनारा अनेक पर्यटकांना खुणावत असतो. सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिसळते त्या मुखावरच हरिहरेश्वर हे गाव आहे. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा. म्हणून पर्यटकांची येथे सतत ये-जा असते. येथे असलेले मंदिर शिवकालीन मंदिर असल्याचे सांगण्यात येते. तसंच हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती या चार डोंगररांगाच्या कुशीत वसलेलं आहे. 

राजमाची

खडकाळ प्रदेशात जवळपास डझनपेक्षा जास्त लेण्या लपलेल्या राजमाची येथे पर्यटक नेहमीच्या रडगाण्यातून विश्रांती मिळावी म्हणून आवर्जुन येतात. येथे असलेले दोन किल्ले, कालभैरव मंदिर हे विभाग ट्रेकर्सना उत्तेजित करतात. फोटोग्राफीसाठीही हा राजमाची फार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे विविध जातीचे पक्षी आणि प्राणी आपल्याला येथे पहायला मिळतात. म्हणून अनेक प्राणी-पक्षी प्रेमीही येथे मोठ्या प्रमाणात येता.  पुण्यापासून राजमाची ८० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे एका दिवसात येथे ट्रेकिंग करता येऊ शकते. 

Web Title: Exactly try to trekking these places in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.