नाट्य संस्कृतीचे आदानप्रदान

By admin | Published: January 2, 2017 02:10 AM2017-01-02T02:10:46+5:302017-01-02T02:10:46+5:30

नाट्यकलेची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यात नेहमीच विविध नाट्यप्रयोग केले जातात. नवनवीन विषय व नाट्यप्रकार पाहण्याची मेजवानी पुणेकरांना उपलब्ध होत असते.

The exchange of drama culture | नाट्य संस्कृतीचे आदानप्रदान

नाट्य संस्कृतीचे आदानप्रदान

Next

पुणे : नाट्यकलेची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यात नेहमीच विविध नाट्यप्रयोग केले जातात. नवनवीन विषय व नाट्यप्रकार पाहण्याची मेजवानी पुणेकरांना उपलब्ध होत असते. असाच एक अनोखा प्रयोग लवकरच पुण्यनगरीत अवतरणार आहे. या उपक्रमामधून संस्कृतीचे आदानप्रदान करुन वेगळा पायंडा पाडला जाणार आहे. पुण्यातील नाट्यवर्तुळात गवगवा असलेली नाटक कंपनी ही संस्था ‘थिएटर एक्सचेंज’ हा आगळा- वेगळा उपक्रम राबवत असून या उपक्रमाअंतर्गत कोलकात्यातील मॅड (मॅड अबाऊट ड्रामा) हा थिएटर ग्रुप पुण्यात येऊन त्यांच्या ‘अ हिस्ट्री आॅफ बचर्स’ हे नाटक सादर करणार आहेत. नाटक कंपनी त्यांचे ‘आयटम’ हे नाटक कोलकात्यात सादर करणार आहे.
थिएटर एक्सचेंजद्वारे कलेचे आदान प्रदान व्हावे व नाट्यरसिकांना पुण्याबाहेरील नाटके पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम नाटक कंपनीने हाती घेतला आहे. आजूूबाजूची सामाजिक, वैयक्तिक, राजकीय, भौगोलिक गोष्टींबाबत नाटकातून भाष्य करण्याचा प्रयत्न होत आहे. नाटक करत असताना, नाटकाच्या भाषेच्या, दृश्य भाषेच्या, रचनेच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्नही यातून केला जातो. ‘मॅड’ हा ग्रूप कोलकात्यातील नाटकवेड्या तरुणांनी सुरु केलेला असून त्यांनी नेहमीच प्रयोगशील व नवीन विषय त्यांच्या नाटकातून हाताळले आहेत.
पुण्यात दि. ७ जानेवारी रोजी हा गु्रप अल्बर्ट कामयू यांच्या नाटकावर आधारित ‘अ हिस्ट्री आॅफ बचर्स’ हे दोन अंकी इंग्रजी नाटक सादर करणार आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अरित्र सेनगुप्ता यांनी केले आहे. नाटक कंपनीच्या सिद्धेश पूरकर लिखित व क्षितीश दाते दिग्दर्शित ‘आयटम’ या नाटकाचा प्रयोग २९ जानेवारी रोजी कोलकत्यात होणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The exchange of drama culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.