मराठी कलाकारांचे हिंदीत खच्चीकरण

By admin | Published: January 14, 2017 03:30 AM2017-01-14T03:30:18+5:302017-01-14T03:30:18+5:30

मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीमधील वातावरणात बराच फरक जाणवतो. मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यावर हिंदी चित्रसृष्टीत

Expansion of Marathi artists in Hindi | मराठी कलाकारांचे हिंदीत खच्चीकरण

मराठी कलाकारांचे हिंदीत खच्चीकरण

Next

पुणे : मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीमधील वातावरणात बराच फरक जाणवतो. मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यावर हिंदी चित्रसृष्टीत वावरताना काहीसे दडपण यायचे. मराठी अभिनेत्रींना भाषेचा प्रश्न आड येत असावा. आजच्या अभिनेत्री हिंदी चांगल्या प्रकारे बोलतात; मात्र हिंदी चित्रसृष्टीत मराठी माणसाचे खच्चीकरण केले जाते.
मी हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत असताना आजूबाजूचे लोक नैैराश्य निर्माण करीत असल्याने दडपण यायचे. त्यामुळे अभिनेत्रींना अवघडल्यासारखे होत असावे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव
यांनी व्यक्त केले. ‘हल्लीचे मराठी चित्रपट आशयसंपन्न आहेत, याबद्दल दुमत नाही. मात्र, नवोदित मराठी तारकांनी हिंदीत जाताना पुरेशी तयारी करून जावे’, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सीमा देव आणि रमेश देव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि श्रीरंग गोडबोले यांनी देव दाम्पत्याशी
संवाद साधला. तत्पूर्वी, रमेश देव व सीमा देव यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले.
सीमा देव यांनी राजाभाऊ परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रयींच्या आठवणींना उजाळा दिला.
‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’ या गाजलेल्या चित्रपटांचे अनुभवही कथन केले. त्या म्हणाल्या, ‘‘आजच्या आणि पूर्वीच्या कामाच्या पद्धतीत बराच फरक जाणवतो. राजाभाऊ स्वत: अभिनय करून, ओरडून
भूमिका समाजावून सांगायचे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी तयार झाले. आजवर मिळालेल्या सर्व यशाचे श्रेय त्यांनाच जाते. राजा ठाकूर, मधुकर पाठक, धर्माधिकारी यांच्यासह काम करतानाही चांगले अनुभव मिळाले.’’
‘अभिमान’ चित्रपटाचा विषय निघताच सीमा देव म्हणाल्या, ‘‘मी आणि रमेश दोघांनीही अभिनयाच्या क्षेत्रात यश मिळविले. अशा वेळी अहंकार दुखावला जाऊन मतभेद होऊ शकले असते; मात्र आम्ही तसे होऊ दिले नाही. संसाराची घडी विस्कटू नये आणि मुलांवर परिणाम होऊ नयेत, यादृष्टीने एकमेकांना समजून आजवरचा प्रवास केला.’’
(प्रतिनिधी)

Web Title: Expansion of Marathi artists in Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.