थापलिंग यात्रेत सदानंदाचा येळकोट, भंडारा आणि खोबºयाची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:38 AM2018-01-03T02:38:00+5:302018-01-03T02:38:10+5:30
‘सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगभल’च्या जयघोषात भंडारा आणि खोबºयाची उधळण करीत नागापूर (ता़ आंबेगाव) येथील थापलिंग खंडोबाच्या यात्रेला मंगळवारी (दि़ २) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला़
निरगुडसर - ‘सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगभल’च्या जयघोषात भंडारा आणि खोबºयाची उधळण करीत नागापूर (ता़ आंबेगाव) येथील थापलिंग खंडोबाच्या यात्रेला मंगळवारी (दि़ २) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला़
उत्तर पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या थापलिंग खंडोबाच्या दर्शनासाठी पुणे, मुंबई, ठाणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांतून अनेक भाविक दर वर्षी येत असतात़ हॉटेल व्यवसायिक, खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध प्रकारची खेळण्याची दुकाने, गृहोपयोगी वस्तू, शेतीसाठी उपयोगाच्या वस्तू, लाकडी व लोखंडी अवजारे अशा अनेक प्रकारच्या विक्रेत्यांनी थापलिंगगड अगदी गजबजून गेला होता़
सरपंच वैशाली पोहकर, उपसरपंच सुनील शिंदे, महेश बोराना, गणेश यादव, गणेश म्हस्के, डॉ़ संजय भोर, संजय पोहकर, बाळासाहेब शिंदे, दगडू पवार, सचिन निकम, विकास पवार, माऊली पवार, सूर्यकांत भागवत, किरण दळे, हनुमंत पोहकर, संदीप यादव, नवनाथ पोखरकर, डॉ. संजय वाघ, निवेदक नीलेश पडवळ यांनी संपूर्ण यात्रेचे नियोजन व व्यवस्था पाहिली़
दरम्यान, थापलिंग गडावर चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून भावित-भक्तांनी या वृक्षांची नासधूस करू नये व झाडांची काळजी घेण्याचे आवाहन देवस्थानाच्या वतीने अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे़
या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल दोन दिवसांमध्ये होते़ पहिल्या दिवशी तळीभरण, दुसºया दिवशी भर यात्रा आणि तिसरा दिवस शिळी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे़े़ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बैलगाडा शर्यतीवरील स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने विश्ोष बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ यात्रेच्या पहिल्याच दिवशी दुपारी तीनपर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे देवस्थानाचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी सांगितले़