कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:18 AM2019-01-31T11:18:13+5:302019-01-31T11:20:11+5:30
दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी पंढरीनाथ बलभीम बागल (वय-६०) यांनी आपल्या राहात्या घरी (दि. २४ रोजी) गळफास घेऊन आत्महत्या केली.
जामखेड : दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी पंढरीनाथ बलभीम बागल (वय-६०) यांनी आपल्या राहात्या घरी (दि. २४ रोजी) गळफास घेऊन आत्महत्या केली.
पंढरीनाथ बागल यांच्याकडे सहकारी बँकेचे एप्रिल २०१६ मध्ये घेतलेले ३७ हजार ७०० रुपये कर्ज आहे. याचे व्याज १४ हजाराच्या आसपास होत आहे. खाजगी सावकाराचेही काही कर्ज होते. दुष्काळ, शेतातील नापिकी व शेतमालाचे पडलेले भाव यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावग्रस्त होते. २४ जानेवारी रोजी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.
पंढरीनाथ बागल यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. यातील एक एकर कांदा लागवड केलेली होती. कांदा पिकाला बाजारात भाव नसल्याने खर्चही निघाला नाही. एक एकर क्षेत्रात ज्वारी आहे. पीक चांगले आले परंतु रानडुकरांच्या उपद्रवाने ज्वारी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. गतवर्षी रानडुकरांनी नुकसान केलेल्या पिकांचा पंचनामा करून वनविभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. यासाठी खर्च हजार रुपये आला व एक वर्षांनी बाराशे रुपये नुकसानभरपाई मिळाली. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर रानडुकरांनी नुकसान केलेले आहे.