मागण्यांसाठी महविद्यालयीन शिक्षकांची धरणे, महाविद्यालयीन शिक्षक संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:31 AM2017-12-10T01:31:38+5:302017-12-10T01:31:42+5:30

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांना शासनाने दिलेली आश्वासने आणि मान्य मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासाठी शासनाविरोधात खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 Filing of college teachers for demands, aggressive college teacher organization | मागण्यांसाठी महविद्यालयीन शिक्षकांची धरणे, महाविद्यालयीन शिक्षक संघटना आक्रमक

मागण्यांसाठी महविद्यालयीन शिक्षकांची धरणे, महाविद्यालयीन शिक्षक संघटना आक्रमक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांना शासनाने दिलेली आश्वासने आणि मान्य मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासाठी शासनाविरोधात खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
वर्षभरात राज्य महा संघटनेने कनिष्ठ शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर ५ वेळा बैठका होऊन घेतलेले निर्णय आणि दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न करता चालढकल केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या वेळी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सहसचिव प्रा. जी. जी. गायकवाड, तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रा. बापूसाहेब चौधरी, कोषाध्यक्ष प्रा. एस. टी. फुंदे, प्रा. बी. डी. वाळुंज, प्रा. बी. एस. पवळे, प्रा. जे. पी. पवळे, प्रा. पांडुरंग घेनंद यांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वरिष्ठ निवडश्रेणीबाबत अन्यायकारक आणि बेकायदेशीर शासन निर्णय गेल्या २३ आॅक्टोबरला काढून संपूर्ण शिक्षण व्यवस्था मोडीत काढून भांडवलदारी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा अनेक प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीकरिता ८ डिसेंबरला राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलने करून निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांनी तहसीलदार सुनील जोशी यांना निवेदन देऊन आंदोलनाकडे लक्ष वेधले आहे.

Web Title:  Filing of college teachers for demands, aggressive college teacher organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे