बाललैंगिक अत्याचारातील ४ आरोपींना केले जेरबंद

By admin | Published: May 6, 2015 06:11 AM2015-05-06T06:11:48+5:302015-05-06T06:13:19+5:30

शहरात ४ ठिकाणी झालेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Four accused of child sexual abuse have been arrested | बाललैंगिक अत्याचारातील ४ आरोपींना केले जेरबंद

बाललैंगिक अत्याचारातील ४ आरोपींना केले जेरबंद

Next

पुणे : शहरात ४ ठिकाणी झालेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ७ वर्षांच्या मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनमध्ये सफाईकाम करणारा विकास जिभाऊ पाटील (वय २९, रा. खेसे चाळ, लोहगाव, सध्या एअरफोर्स स्टेशन क्वार्टर्स) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी ही दुसरीत शिकत असून, दि. २२ ते २४ एप्रिलदरम्यान आरोपीने पीडित मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. तिला घरात नेऊन त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी धावत घरी आली आणि झालेला प्रकार तिने आईला सांगितला. यााबाबत मुलीच्या वडिलांना कळाल्यानंतर त्यांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने कृत्य केले नसल्याचे सांगितले. तक्रार दिल्यास एअरफोर्स स्टेशनच्या आतमध्ये येऊ देणार नाही, अशी धमकीही दिली होती.
घरात जबरदस्तीने घुसून अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग करणाऱ्या महेश ज्ञानेश्वर खराबे (२५, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी १३ वर्षीय पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. २० एप्रिल रोजी पीडित मुलगी राहत्या घरी एकटी असताना आरोपीने पीडित मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केला. (प्रतिनिधी)

अल्पवयीन मुलीचा पाठलाग
> येरवडा येथे बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड काढणारा निखिल अर्जुन वाघमारे (वय २४, रा. खडकी, येरवडा) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. आरोपीने पीडित मुलीला त्रास देऊन तिला बदनाम करण्याचीही धमकी दिली व मोबाईलवरून अश्लील मेसेजही पाठविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
> अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी वेल्हा पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांपैकी हेमंत गणेश कुबडे (२२, पर्वती पायथा, भवानीनगर, जनता वसाहत) याला अटक केली आहे. त्याची पत्नी ज्योती (१९) हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीचे अपहरण केले. त्याला कुबडे दाम्पत्याने आश्रय दिल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचे फियार्दीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींवर बलात्कार, अपहरण, अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Four accused of child sexual abuse have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.