कचरा डेपो आंदोलन तीन महिने स्थगित
By admin | Published: June 10, 2017 02:01 AM2017-06-10T02:01:43+5:302017-06-10T02:01:43+5:30
पुणे महापलिकेच्या आयुक्तांनी येथील जमीनधारकांच्या वारसांचा नोकरीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी असून पालिकेत तीन महिन्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
फुरसुंगी : पुणे महापलिकेच्या आयुक्तांनी येथील जमीनधारकांच्या वारसांचा नोकरीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी असून पालिकेत तीन महिन्यात त्यांना नोकऱ्या मिळतील. असे लेखी पत्र दिल्याने आज येथील ग्रामस्थांनी सुरु केलेले कचरा डेपो बंदचे आंदोलन तीन महिन्यासाठी स्थगित केले आहे.
तीन महिन्यांनंतर जर प्रशासनाने आपला शब्द पाळला नाही तर डेपोवर कचऱ्याच्या गाड्या नव्हे तर एकही अधिकारी फिरकू देणार नाही आणि टाळे ठोकू असा इशारा दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
आज सकाळी येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले. कचऱ्याच्या गाड्या परत पाठवल्या. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी येथे येवून ग्रामस्थांची भेट घेतली चर्चा करुन लेखी पत्र ग्रामस्थांना दिले. मध्यम व दीर्घकालिन करावायची घनकचरा जनजागृत्ती, नागरिकांचा सहभाग, कचरा विलगीकरण, संकलन, प्राथमिक व दुय्यम वाहतुक, प्रक्रिया तसेच भविष्यात निर्माण ( दहा वर्ष) होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन यासाठी लागणारी आवश्यक जमीन त्याचे आरक्षण, भूसंपादन व या सर्व बाबीसाठी करावी लागणारी अंदाजपत्रकीय आर्थिक तरतूद व त्याअनुषंगाने करावयाचे कालबध्द नियोजन व त्याचे प्रभावीपणे अंलवजावणीसाठी करावयाच्या उपाययोजना यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार कृती आराखडा प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी महापौर व आयुक्तांना आराखड्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे महापालिकेने कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमीनधारकांच्या वारसांना नोकरीबाबतचा पाठिवेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आहे.
तसेच उरुळी देवाची फुरसुंगी येथील साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करुन रिकाम्या होणाऱ्या जागेपैकी उर्वरित जागा वापराबाबत सर्वसामान्य धोरण ठरविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अनुषंगिक मागण्याबाबत सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करण्यात येईल, असे सुचित केले आहे, असे आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.