चांगल्या आरोग्यसेवेसाठी सुसंवाद महत्त्वाचा : विपीन चेकर; पुण्यात हेल्थकेअर परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:29 PM2017-12-12T15:29:11+5:302017-12-12T15:31:36+5:30

चांगल्या आणि सुरक्षित आरोग्य सेवेसाठी रुग्ण व नातेवाईक, स्थानिक पोलीस, वकील यांच्याशी डॉक्टर, रुग्णालय व्यवस्थापनाने सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विपीन चेकर यांनी केले.

Good communication for good healthcare: Vipin checker; Healthcare Council in Pune | चांगल्या आरोग्यसेवेसाठी सुसंवाद महत्त्वाचा : विपीन चेकर; पुण्यात हेल्थकेअर परिषद

चांगल्या आरोग्यसेवेसाठी सुसंवाद महत्त्वाचा : विपीन चेकर; पुण्यात हेल्थकेअर परिषद

Next
ठळक मुद्देलेवा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (एलसीसीआयए)तर्फे ‘हेल्थकेअर’ परिषदपोलिसांच्या फोननंतर न घाबरता धैर्याने सामोरे जावे : विपीन चेकर

पुणे : चांगल्या आणि सुरक्षित आरोग्य सेवेसाठी रुग्ण व नातेवाईक, स्थानिक पोलीस, वकील यांच्याशी डॉक्टर, रुग्णालय व्यवस्थापनाने सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रुग्णाचे दस्तावेज आणि सर्व आवश्यक कागदपत्राच्या नोंदी असतील, तर पोलिसांपासून तुम्हाला संरक्षण मिळू शकते आणि तुम्ही अधिक सक्षम आरोग्य सेवा पुरवू शकता’, असे प्रतिपादन मुंबई येथील सामाजिक व पोलीस कार्यकर्ते आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विपीन चेकर यांनी केले.
लेवा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (एलसीसीआयए) तर्फे आयोजित ‘हेल्थकेअर’वरील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘पोलिसांच्या फोननंतर पुढे काय?’ या विषयावर चेकर बोलत होते. यावेळी डॉ. विश्वनाथ कोल्हे डॉ. सुभाष चौधरी, डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रवींद्र चौधरी, उद्योजक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, वासू पाटील, गौरव अतरदे, प्रशांत चौधरी, डॉ. पवन भोळे, डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. संदीप भिरूड, सचिव डॉ. राहुल चौधरी, सहसचिव डॉ. विवेक नेमाडे, कोषाध्यक्ष डॉ. भूषण जावळे, सहकोषाध्यक्ष  स्वप्नील भोळे, आयोजन प्रमुख डॉ. रत्नप्रभा चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 
या परिषदेमध्ये हेल्थकेअर, मेडिको लीगल, मार्केटिंग इन हेल्थकेअर, आरोग्यसेवेत आयटीची भूमिका आदी विषयांवर परिसंवाद झाले. यावेळी डॉ. विश्वनाथ कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सुभाष चौधरी यांना हेल्थकेअर आयकॉन आणि डॉ. उल्हास पाटील यांना व्हर्सटाईल पर्सोनॅलिटी आॅफ हेल्थकेअर प्रदान करण्यात आला.
चेकर म्हणाले, ‘एखाद्या प्रकरणात पोलिसांचा फोन आल्यास आपण घाबरून जातो. मात्र, आपला स्थानिक पोलिसांशी चांगले संबंध असतील आणि कागदपत्रे व्यवस्थित असतील, तर घाबरण्याचे कारण नाही. वकिलामार्फत जामीन मिळवण्याचा प्रयत्न करावा. कठिण प्रसंग उद्भवल्यास कुटुंबीयांना माहिती असावी. पोलिसांच्या फोननंतर न घाबरता धैर्याने सामोरे जावे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावेत. सुरक्षेची काळजी घ्यावी.’
डॉ. सुरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रत्नप्रभा चौधरी, पूनम यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेंद्र ठोंबरे यांनी आभार मानले.

Web Title: Good communication for good healthcare: Vipin checker; Healthcare Council in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.