सप्टेंबरमध्ये चाखायला मिळणार ‘हापूस’ गोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 05:25 PM2018-09-09T17:25:04+5:302018-09-09T17:25:47+5:30
गुलटेकडी येथील मार्केड यार्डमध्ये हंगामपूर्व ‘रत्ना हापूस’ आबा दाखल झाला आहे.
पुणे : आंब्याचा हंगाम संपून तीन महिने लोटल्यानंतरही ऐन सप्टेंबरमध्ये पुणेकरांना ‘हापूस’ आंब्याची गोडी चाखायला मिळणार आहे. गुलटेकडी येथील मार्केड यार्डमध्ये हंगामपूर्व ‘रत्ना हापूस’ आबा दाखल झाला आहे. आठ-दहा दिवसांचा हंगाम असलेल्या या आब्याला चांगला भाव मिळत असून, घाऊक बाजारात एक हजार रुपये डझन दराने विक्री होत आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातून आंब्याला मागणी आहे.
गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फळबाजारात रविवार (दि.९) रोजी रत्नागिरी येथील शेतकरी राजन भाटकर यांच्या शेतातील हंगामपूर्व तब्बल १४० डझन ‘रत्ना हापूस’ आंब्याची आवक झाली असल्याची माहिती फळांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. काही झाडांना वर्षांतून दोन वेळा आंब्याचे मोहोर येतो. गेल्या काही वर्षांपासून सप्टेंबरमध्ये ‘रत्ना हापूस’ आंब्याची आवक होत आहे. नियमित हंगामाशिवाय येणा-या या आंब्याला चांगली मागणी असते. आतून केशरी रंगाचा हा आंबा चवीला अत्यंत गोड असून, काही ठराविक लोकांकडून दर वर्षी हंगामपूर्व आंब्याची मागणी होते. या आंब्याचा हंगाम पुढील किमान १५ दिवस सुरु राहिल, अशी माहिती मोरे
रत्ना आंबा वषार्तून दोन वेळा बाजारात दाखल होतो़ यामध्ये मे अखेरीस आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आंबा मार्केयमध्ये येते. मात्र सप्टेंबर महिन्यात दाखल होणारा आंबा हा हंगामपुर्व असतो़ हा आंबा चवीला गोड असून पुणे, पिंपरी चिंचवड आणि उनगरांमधील स्टॉलधारकांकडून यास चांगली मागणी असल्याचे मोरे यांनी नमूद केले़ या आंब्यास प्रतिनुसार ७०० ते १००० रुपये भाव मिळाला आहे.