हॅरिस ब्रिजचे आॅडिट पुणे महापालिकेकडून

By Admin | Published: August 9, 2016 01:40 AM2016-08-09T01:40:41+5:302016-08-09T01:40:41+5:30

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांना जोडणारा बोपोडीतील हॅरिस ब्रीज असून, त्या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट २०१३मध्ये केले होते.

Harris Bridge audit of Pune Municipal Corporation | हॅरिस ब्रिजचे आॅडिट पुणे महापालिकेकडून

हॅरिस ब्रिजचे आॅडिट पुणे महापालिकेकडून

googlenewsNext

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांना जोडणारा बोपोडीतील हॅरिस ब्रीज असून, त्या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट २०१३मध्ये केले होते. त्यात येत्या पंधरा वर्षांत पुलास काही धोका नसल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड जोडणारा हॅरिस ब्रीज हा ब्रिटिशकालीन आहे. पुलाबाबत दक्षता घेण्याचे काम महापालिकांनी सुरू केले आहे. दरम्यान, सध्या असणाऱ्या पुलावर ताण येत आहे. त्यामुळे या पुलास समांतर पूल उभारण्याचे काम दोन्ही महापालिकांकडून केले जाणार आहे. त्याचा आराखडाही तयार केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत.
हॅरिस ब्रीज ब्रिटीशकालीन आहे. या पुलाबाबत योग्य त्या दक्षता घेण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे पुणे महापालिकेने २०१३ मध्ये स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. हा पूल चांगला असून, या पुलाला पुढील पंधरा वर्षे कोणताही धोका नसल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटच्या अहवालात म्हटले असल्याचे आयुक्त वाघमारे यांनी नमूद केले(प्रतिनिधी)

महाड येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे. या संदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे. हॅरिस ब्रीजचे स्ट्रक्चरल आॅडिट पुणे महापालिकेने २०१३मध्ये केले होते. त्यात हा पूल चांगला आहे, असा अहवाल एका संस्थेने दिला होता. याविषयीचा पुणे महापालिकेने केलेल्या आॅडिटचा अहवाल केला. तसेच या पुलास आणखी पंधरा वर्र्षे धोका नसल्याचे अहवालात नमूद केले होते. दोनच वर्षांपूर्वी आॅडिट केले आहे. मात्र, आत्ताच महाड येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर दक्षता, यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून संबंधित संस्थेकडून पुन्हा एकदा आॅडिट करून घेऊ.- दिनेश वाघमारे, आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Web Title: Harris Bridge audit of Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.