20 हजार फुटांवर झेंडा फडकवून त्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:37 PM2018-08-22T14:37:27+5:302018-08-22T14:42:53+5:30
पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्याराेहकांनी हिमालयातील माऊंट युनामवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला.
पुणे : पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्याराेहकांनी हिमालयातील माऊंट युनाम हे 20044 फूट उंचीचे शिखर 15 अाॅगस्ट राेजी सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकवत अनाेख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला.
दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था ही 1993 साली स्थापन करण्यात अाली हाेती. संस्थेच्या 25 व्या वर्षपूर्तीनिमित्त ही विशेष माेहीम हाती घेण्यात अाली हाेती. या अाधी या संस्थेमार्फत सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक माेहिमा व रिबाेल्टिंग सारखे उपक्रम राबविले अाहेत. त्याचप्रमाणे दुर्ग संवर्धन संबंधाने जनजागृती सुद्दा करण्यात अाली अाहे. माऊंट युनाम ची माेहिम 15 दिवसांची हाेती. 15 ऑगस्ट 2018 रोजी पहाटे 3.25 वाजता संस्थेच्या 10 गिर्याराेहकांनी कॅम्प 1(5200मीटर) पासून शिखरा कडे चढाई करण्यास सुरुवात केली. सकाळी 10.33 वाजता प्रथम स्वप्नील गरड व गोपाळ कडेचुर यांनी शिखर माथा गाठला. पाठोपाठ 11.20 ला अनिकेत बोकील, प्रशांत अडसूळ व सदगुरु काटकर शेर्पान बरोबर शिखरावर पोहोचले. दहा मिनिटांनी 22 फूट उंच लोखंडी खांबावर 14 फूट रुंद × 21 फूट लांब राष्ट्रध्वज फडकावून 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात अाला.त्यावेळेस गोपाळ कडेचुर यांनी गिटारवर राष्ट्रगीत धून वाजवून उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
संस्थेमार्फत दहा जणांनी या मोहीमेत सहभाग घेतला. ध्वजासाठी लागणारा लोखंडी खांब व पूर्ण ध्वज सर्वांनी स्वतः शिखरापर्यंत महतप्रयासाने पोहचवला. खांबाचे वजन 14.5 किलो व राष्ट्रध्वजाचे वजन 6.5 किलो होते. शिवाजी महाराजांची मुर्ती वर नेऊन त्याचे देखील पूजन करून शिव घोषणा यावेळी देण्यात आली. या माेहिमेची नाेंद लिम्का बुक अाॅफ रेकाॅर्डमध्ये नाेंद हाेईल असा विश्वास या गिर्याराेहकांनी व्यक्त केला. ही माेहिम फत्ते केल्यानंतर गिर्याराेहकांना अाकाश ठेंगणे झाले हाेते.
या माेहिमेत सुनिल पिसाळ, प्रशांत अडसुळ, धनराज पिसाळ, गोपाळ कडेचुर, स्वप्निल गरड , सोमनाथ सोरकादे, सद्गुरू काटकर, अनिकेत बोकिल, अभिजित जोशी, सायली महाराव यांनी सहभाग घेतला.